पश्चिम बंगालमध्ये भाजपा ममता बॅनर्जींचा गड उद्ध्वस्त करणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान संपन्न झाले. निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे.
मात्र दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल्सचे आकडे काय येतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमधील सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने गेल्या काही वर्षांपासून जोरदार ताकद लावली आहे. २०२१ च्या निवडणुकीत भाजपाने सर्व शक्ती पणाला लावल्यानंतरही त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र यावेळी सत्ता स्थापन करूच, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता.
२०२१ चा निकाल काय?
पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण २९४ जागा असून बहुमताची संख्या १४८ इतकी आहे. २०२१ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने २१३ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले होते. तर भाजपाला ७७ जागांवर विजय मिळाला होता. कधी काळी डाव्या पक्षांचा गड मानल्या गेलेल्या पश्चिम बंगालमध्ये २०२१ साली डावे आणि काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या होत्या.
एक्झिट पोल २०२६ चे आकडे काय सांगतात?
पीपल्स पल्स
तृणमूल काँग्रेस (TMC) : 177-187
भाजपा (BJP) : 95-110
काँग्रेस : 1-3
डावी आघाडी : 0-1
इतर : 1-2
मॅट्रिझ
तृणमूल काँग्रेस (TMC) : 125-140
भाजपा (BJP) : 146-161
काँग्रेस :
डावी आघाडी :
इतर : 6-10
पी-मार्क
तृणमूल काँग्रेस (TMC) : 118-138
भाजपा (BJP) : 150-175
काँग्रेस :
डावी आघाडी :
इतर : 2-6
चाणक्य
तृणमूल काँग्रेस (TMC) : 130-140
भाजपा (BJP) : 150-160
काँग्रेस : –
डावी आघाडी : –
इतर : 6-10
२०२१ च्या एक्झिट पोलचे आकडे काय होते?
२०२१ साली मतदानानंतर ममता बॅनर्जींचा निसटता विजय होईल, असे अंदाज एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात निकालानंतर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने दमदार विजय मिळवला. तर भाजपाला पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळेल असे अंदाज इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया व जन की बात या दोन संस्थांनी वर्तवले होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला जवळपास शंभरहून अधिक जागा मिळतील, असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..