बुलडाणा जिल्ह्यात कोरोना महामारी थांबविण्याकरीता जिल्हा आरोग्य यंत्रणा अपयशी
आ. संजय गायकवाड यांनी केली आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे तक्रार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिनेश मुडे मो-९७६३१२५०७२
बुलडाणा: (प्रतिनिधी) बुलडाणा जिल्ह्यात कोरोना महामारी थांबविण्यामरीता जिल्हा आरोग्य प्रशासन अपयशी ठरत आहे. अधिकार्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे जिल्ह्यात कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात पसरत असल्याची तक्रार आमदार संजय गायकवाड यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.
आज दि. 7 सप्टेंबर 2020 रोजी आ. संजय गायकवाड यांनी मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना महामारी विषयी सविस्तर चर्चा करून कोरोना महामारी विषयावर लक्ष वेधले. जिल्ह्यात कोरोनाची किती भयावह परिस्थिती आहे हे त्यांना सांगीतले. सोबतच जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडीत व जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. कांबळे यांच्यात समन्वये नाही. त्यामुळे अनेक चुकीचे निर्णय घेतल्या जात आहे. त्याचे नुकसान जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत असुन मृत्युचे प्रमाणात वाढ झाली आहे. याला र्ें क्त जिल्हा आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे. कोरोना बाधीत रूग्णांचा रिपोर्ट उशीरा प्राप्त होत असल्यामुळे कोरोनाची लागण वाढत आहे. पॉझिटीव्ह रूग्णांना क्वॉरंटाईन केल्या जात नाही, एखादा रूग्ण पॉझिटीव्ह आला तर त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिल्या जात नाही. त्यामुळे प्रशासन पॉझिटीव्ह रूग्णांच्या घराच्या परिसरात प्रतिबंधक क्षेत्र किंवा बंदोबस्त लावु शकत नाही. जो रूग्ण पॉझिटीव्ह आला त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची तपासनी केल्या जात नाही. बुलडाण्यात कोरोणा रूग्णाकरीता धाड रोडवर अपंग विद्यालयात व आयुर्वेदिक महाविद्यालयात रूग्णांचे प्रचंड हाल होत आहे. त्यांच्या खोलीत घाण व कचरा पडलेला आहे. स्वच्छालयात घाण आहे. प्रातविधीकरीता रूग्णांना बाहेर जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, बेचव व निकृष्ठ जेवन दिल्या जात आहे. स्वच्छतेच्या कोणत्याही उपाय योजना येथे नाही. त्यामुळे हा संसर्ग किती झपाट्याने जिल्ह्यात वाढत आहे याची कल्पना आपनच करा? याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा आरोग्य यंत्रणा आहे. अश्या निष्क्रीय अधिकार्यांवर कारवाई करून त्यांना समज दिला पाहिजे अशी विनंती आ. संजय गायकवाड यांनी आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी चर्चा करतांना केली आहे.
कृपया सोबत र्ें ोटो पाठविला आहे.