बुलडाणा विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना तात्काळ आर्थीक मदत द्या
आमदार संजय गायकवाड यांनी केली कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे मागणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिनेश मुडे मो-९७६३१२५०७२
बुलडाणा: (प्रतिनिधी) बुलडाणा विधानसभा मतदार सघात गेल्या आठवड्यापासुन दमदार पाऊस झाल्याने अनेक गावात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेकडो शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या शेतीचे तात्काळ सर्व्हे करून त्यांना आर्थीक मदत द्यावी अशी मागणी आ. संजय गायकवाड यांनी कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांची आज दि. 7 सप्टेंबर 2020 रोजी त्यांच्या दालनात भेट घेवुन केली. यावेळी त्यांच्या सोबत खासदार प्रतापरावज जाधव हे सुध्दा उपस्थित होते.
बुलडाणा विधानसभा मतदार संघात सुरूवातीपासुन पाऊस चांगला होता. त्यामुळे पिक सुध्दा मोठ्या प्रमाणात आले. मात्र गेल्या आठवड्यापासुन मोताळा व बुलडाणा तालु्नयात सततधार पाऊस सुरू असल्याने काही भागात पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये मोताळा तालु्नयातील कोराळा, गोतमारा, हनवतखेड, कुर्हा, पिंपळपाटी, शेलापूर तसेच तळणी व नळगंगा धरणाजवळील शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सततधार पाऊस असल्याने अनेक भागात नदी, नाले व ओढ्यांना पुर आल्याने हजारो हे्नटर शेती पाण्याखाली आली. अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे. शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिसकावुन घेतला आहे. आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आधिच बँकाकडुन कर्ज घेवुन शेतीची पेरणी केली. आता शेत व पिक वाहून गेल्याने शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे.
या परिसरातील पिकांची व शेतीचे सर्व्हे करून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना तात्काळ आर्थीक मदत जाहिर करण्यात यावी अशी मागणी यावेळी आ. गायकवाड यांनी केली. त्याच्या सोबत खा. प्रतापराव जाधव हे सुध्दा उपस्थित होते.
कृपया : सोबत र्ें ोटो पाठविला आहे.