५० रुपयांची लाच घेतांना तीन ट्रॅफिक पोलीसांना अटक; अकोला एसीबीची कारवाई
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिनेश मुडे मो-९७६३१२५०७२
बुलडाणा
जनावरांची वाहतूक करणाºया वाहन चालकांकडून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातील
तीन वाहतूक पोलीसांना मलकापूर रोडवरील चौधरी गॅस पंपाजवळ ५० रुपयांची लाच
घेतांना रंगेहात घेतांना अटक केली. ही घटना आज सोमवारी ७ सप्टेंबर रोजी
दुपारी साढे ३ वाजता घडली. सदर कारवाई अकोला एसीबीच्या पथकाने केली असून
सुरेश कचरे, उमेश भुते, विशाल वारडेकर असे या तीन ट्रॅफिक पोलीसहवालदारांचे नावे आहेत.
मलकापूर येथील दिनेश आस्टकर उर्फ मुन्ना राठोड हे मलकापूर ते बुलडाणा येथून विविध वाहनावर जनावरे घेवून येत असतात. बुलडाण्यात आल्यावर मलकापूर रोडवरील चौधरी गॅस पंपावर ट्रॅफिक पोलीस सुरेश कचरे, उमेश भुते, विशाल वारडेकर हे सगळे नेहमी वाहन अडवून या वाहन चालकांना त्रास देवून पैशाची मागणी करत होते. याप्रकरणी दिनेश आस्टकर यांनी याबाबतची तक्रार एक
महिण्यागोदर अकोला एसीबी यांच्याकडे दाखल केली होती. यावरून अकोला एसीबीने २५ आॅगस्ट रोजी बुलडाण्याकडे जनावर येणाºया वाहनात शासकीय पंचबसवून पडताळणी केली. यावेळी ट्रॅफिक पोलीस हवालदारांनी वाहनचालक आस्टकर यांना पैशाची मागणी केली. यावेळी पैसे नसल्याचे सांगून दुसºया फेरीत आणून
देतो असे चालक आस्टकर यांनी संगितले. दरम्यान आज अकोला एसीबीच्या पथकाने बुलडाण्यातील चौधरी गॅस पंपाजवळ सापळा रचला आणि आणि जेव्हा फिर्यादी आस्टकर हे छोटा हत्ती या वाहनात म्हशी घेवून आले. तेव्हा चौधरी गॅसपंपावर त्यांना अडवून पैशाची मागणी केली. तेव्हा सुरेश कचरे, उमेश भुते,विशाल वारडेकर या तिन्ही ट्रॅफिक पोलीस हवालदाराला ५० रुपयांची लाच घेतांना अकोला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. तिघे लाचखोर ट्रॅफिक
पोलीस हवालदाराला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहेत.सदर कारवाई अकोला एसीबीचे उपअधीक्षक शरद नेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस