” … हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा , ” कंगनाच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर
कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मुंबईत येण्यापासून रोखून दाखवण्याचं कंगनाचं आव्हान
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई ही मराठी माणसाच्या बापचीच आहे. ज्यांना मान्य नाही त्यांनी त्यांचा बाप दाखवावा असं ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीर वाटत असल्याचं वक्तव्य केल्यानंतर कंगना रणौतवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. कंगनाने यावर ट्विट करत आपल्याला मुंबईत येण्यावरुन धमक्या मिळत असून ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं थेट आव्हान दिलं आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. प्रॉमिस. जय हिंद, जय महाराष्ट्र”

कंगनाने ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?
‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर रोखून दाखवा’ असं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, “पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. ही मुंबईत १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. मुंबईचं रक्षण सातत्याने आपल्या पोलिसांनी केलं आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस शहीद झाले. कसाबला मुंबई पोलिसांनी पकडलं. १९९२ च्या दंगलीत मुंबईचे पोलीस शहीद झाले. मुंबई पोलिसांनीच लोकांना वाचवलं. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगेरै लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही अशी वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारनं, गृहमंत्रालयानं कठोर कारवाई केली पाहिजे”. हे मुंबई पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याच मोठं कारस्थान दिसत आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….