विकास लवांडेंना न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; कोर्टाने पोलिसांची मागणी फेटाळली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा प्रवक्ते विकास लवांडे यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी देण्यात आली आहे. वारकरी वारकरी संप्रदायाविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत पोलिसांनी लंवाडे यांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी कोर्टाकडे पोलीस कस्टडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळली आहे
विकास लवांडे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पुणे पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आणि आणखी काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना त्यांच्या पोलीस कस्टडीची मागणी केली. पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी न्यायालयात तसा जोरदार युक्तिवादही केला. न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद आणि सादर केल्यानंतर पोलिसांची मागणी फेटाळली. त्यानंतर न्यायालयाने विकास लवांडे यांना थेट 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता विकास लवांडे यांची रवानगी कारागृहात (जेल) होणार आहे. पोलीस कस्टडी नाकारली गेल्यामुळे आता पोलिसांना लवांडे यांची थेट चौकशी करता येणार नाही. जर पोलिसांना त्यांची पुन्हा चौकशी करायची असेल, तर त्यांना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून न्यायालयाची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे.

लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…
पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करा; गडकरींचा मोठा दावा- वाहने आता फक्त २५ रुपये दराच्या इंधनावर चालतील…