सुनेत्रा पवार यांच्या शपविधीवर संजय राऊत म्हणाले, ‘शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य योग्यच’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे.
मात्र, अजित पवार यांच्या निधनातून राज्य सावरत आहे तोवर सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र टीका केली आहे. या सर्व घडामोडींना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
“अजित पवार यांच्या जाण्याचं दुःख राज्यातील प्रत्येक घरात आहे. मात्र, या दुःखाच्या काळातही काही जण राजकीय डावपेच रचत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न झाला होता, असे सांगत राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील अनेक प्रमुख घराणी फोडण्याचं काम भाजपने केलं आहे. दुखवट्याचा काळ संपेपर्यंत आम्हाला राजकीय वक्तव्य करण्यात रस नाही. सध्या राज्य शोकात आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अजित पवार यांचा स्वतंत्र गट आहे आणि शरद पवार यांनी सकाळी केलेले वक्तव्य योग्य आहे. “प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ हे राष्ट्रीय नेते आहेत. ते वर्षा बंगल्यावर जाऊन चर्चा करून आले, हे मी स्वतः पाहिलं आहे. हा त्यांचा अंतर्गत विषय असून निर्णय त्यांनीच घेतला आहे,” असेही राऊत म्हणाले.
अजित पवार यांच्या माती सावडण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री भेटीसाठी जात असल्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “हे कितपत योग्य आहे, हे संपूर्ण राज्य पाहत आहे. अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण सध्या सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य राजकीय भूमिकांवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “या कठीण काळात त्यांच्या राजकीय वाटचालीवर बोलणं योग्य नाही. तो त्यांच्या घराण्याचा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. त्यामुळे याबाबत प्रश्न त्यांनाच विचारले गेले पाहिजेत.”

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..