“सुनेत्रा पवार, ‘गिधाडां’ पासून सावध राहा!” मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक इशारा; पवार कुटुंबाला एकत्र येण्याचे आवाहन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, आता त्यांच्याभोवती ‘गिधाडांचा’ घेराव वाढू शकतो. त्यांनी अतिशय जपून पावलं टाकावीत,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर जरांगे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवारांना सावध केले आहे. ते म्हणाले, “दादा हे दादा होते. पण आता दादांच्या जाण्यानंतर काही नवीनच ‘गिधाडं’ त्यांच्याभोवती घिरट्या घालू लागली आहेत. ही नवी ‘ढेकणं’ खूप रक्त पिऊ शकतात आणि घात करू शकतात. सुनेत्रा वहिनींनी या ढेकणांवर लक्ष ठेवावं.”
पवार कुटुंबाच्या एकत्रीकरणावर भाष्य
सुनेत्रा पवार यांनी या कठीण काळात पवार कुटुंबाला सोबत घ्यावे, असा सल्लाही जरांगे यांनी दिला. “संकटकाळी शेवटी कुटुंबच कामाला येतं. पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब एकसंघ झाले तरच राज्यात मोठी मुसंडी मारता येईल. सुनेत्रा पवारांना आता अत्यंत काटेरी रस्त्यावरून चालावे लागणार आहे,” असेही ते म्हणाले. तसेच पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांनी दिलेला सल्ला पाळावा, असेही त्यांनी नमूद केले.
धनंजय मुंडेंवर टीका आणि ‘घातपात’ चौकशीची मागणी
“हे कुठेही पळतं, त्याला काही मिळत नाही. अजित पवार एवढेच फडणवीस हुशार आहेत, ते याला जवळ करणार नाहीत, आतापर्यंत यांचं दुखत होतं. पण यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.” अशी टीका त्यांनी धनंजय मुंडेंवर केली. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल ‘घातपात’ असेल तर चौकशी होईलच, असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार यांना आता काटेरी रस्त्यावरून चालावे लागणार आहे, असे म्हटले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..