रातोरात सुत्र हालली, पटेलांनी ‘टायमिंग’ साधलं अन् शरद पवारांना चकवा, देवगिरीवरची बैठक ठरली गेमचेंजर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राजकारणाचा एक नियम असतो, वेळ चुकली की खेळ बिघडतो… हीच गोष्ट राजकारणाचे भीष्मपितामह म्हटल्या जाणाऱ्या शरद पवारांसोबत घडल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांनी सुत्र हातात घेतली आहे.
काल राजभवनावर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सर्व घटनाक्रमाची सुरूवात झाली सहयोग सोसायटीमधून… अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीमध्ये शुक्रवारी हालचाली सुरू झाल्या. अजित पवार यांच्या जाण्याने आता शरद पवार सुत्र हातात घेतील अन् पार्टी पुन्हा शरद पवारांच्या ताब्यात जाईल, अशी भीती अजित पवार गटातील नेत्यांना वाटत होती. त्यामुळे रातोरात नेतृत्व तयार करण्याची गरज होती. त्याचवेळी नाव समोर आलं ते सुनेत्रा पवार यांचं…
मुंबईत प्लॅन ठरला, बारामतीत हालचाली…
मुंबईत बैठकीचा तडाखा सुरू झाला. प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ फडणवीसांना भेटले. तिथं रणनिती तयार करण्यात आली अन् पण प्रफुल्ल पटेल पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आम्ही पक्षाच्या गटनेतेपदासाठी कोणाचेही नाव निश्चित केलेले नाही. आमदारांशी चर्चा करून शनिवारी अंतिम निर्णय घेतला जाईल. यामुळे शरद पवार गटाने मोठ्या हालचाली केल्या नाहीत. मात्र, शरद पवारांना टाईम न देण्याचा प्लॅन आधीच रेड्डी होता. अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीवेळी नियुक्त केलेल्या राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी तातडीने बारामती गाठली अन् सुनेत्रा पवारांना प्रस्ताव दिला.
सुनेत्रा पवारांनी मुंबई जवळ केली अन्…
शुक्रवारी रात्री दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणासाठी बैठक बोलवली होती. मात्र, सुनेत्रा पवारांना बारामतीत जास्त वेळ थांबू द्यायचं नाही, असं ठरवण्यात आलं. त्यानंतर सुनेत्रा पवारांना रातोरात मुंबईकडे बोलवण्यात आलं अन् देवगिरीवर खलबतं सुरू झाली. जय पवारांना सोबत घेऊन सुनेत्रा पवारांनी मुंबई जवळ केली. त्यानंतर प्रतिभा पवारांना फोन करून सुनेत्रा पवारांनी शपथ घ्यायला चालल्याचं सांगितलं. तिथंच पवारांचा गेम फसला. पवारांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ‘ अजितदादांची शेवटची इच्छा’ म्हणत छुपा मेसेज पोहोचवला खरा पण सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्री होणार हे फिक्स झालं होतं.
बारामतीत पार्थ पवारांची फिल्डिंग
प्रफुल्ल पटेल, भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी देवगिरीवर ठिय्या दिला होता. बारामतीच्या हालचालींवर त्यांचं चांगलंच लक्ष होतं. तर दुसरीकडे पार्थ पवारांना बारामतीच फिल्डिंगवर ठेवलं. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर पार्थ पवार शरद पवारांना भेटायला गेले. हा देखील एक रणनितीचा भाग असावा. पार्थ पवारांनी बारामती सांभाळली. तब्बल दीड तास पार्थ शरद पवारांसोबत होते. पण सुनेत्रा पवारांना थांबवण्याचं टायमिंग चुकलं.
सुप्रिया सुळेंचा अखेरचा डाव…
दरम्यान, अखेरचा डाव म्हणून सुप्रिया सुळेंनी सुत्र हातात घेतली अन् अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांची भेट घेतली. तिथून सुप्रिया सुळेंच्या हाती काहीही लागलं नाही, अशी चर्चा आहे. तर पार्थ पवार शरद पवारांकडे सत्तेत येण्याचा प्रस्ताव घेऊन गेले होते का? असा सवाल देखील विचारला जात आहे. शुक्रवारी सकाळी शरद पवारांकडे झुकलेलं राजकारण शनिवारी दुपारी हातातून निसटलं, असं चित्र पहायला मिळालं. त्याला एकमेव कारण म्हणजे चुकलेलं टायमिंग…!

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..