मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा परिषदचा प्रचार करणार नाहीत; अजितदादांच्या निधनामुळे घेतला निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा पसरलीय. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालीय. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे झेडपी प्रचाराच्या सभा घेणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात ७ दिवसात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी २२ प्रचारसभांचे नियोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेडपीचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी त्यांच्या तीन सभा कोकणात होत्या. त्याच दिवशी सर्व सभा रद्द केल्या. यानंतर राज्यातल्या इतर सभाही रद्द केल्याची माहिती आता समोर येतेय. अजित पवार यांच्या निधनामुळे झेडपी प्रचार न करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शनिवारी सायंकाळी घेतली. शपथविधीनंतर अवघ्या तासाभरात खातेवाटप जाहीर करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखातं स्वतःकडे ठेवलं असून सुनेत्रा पवारांकडे इतर खात्यांची जबाबदारी देण्यात आलीय. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक ही खाती देण्यात आलेली आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले माणिकराव कोकाटे यांच्याकडील दोन्ही खाती आता सुनेत्रा पवार बघतील.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..