भाजपासोबत असलेल्या अजित पवारांसोबत शरद पवार का जातायेत हे त्यांनी सांगावं ; राऊतांची टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “पालिका निवडणुकीसाठी मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र आले आहेत, तर अजित पवार गट मुंबईत स्वतंत्र लढत असून त्यांनी रविवारी (28 डिसेंबर) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
तर दुसरीकडे पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याची घोषणा स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (28 डिसेंबर) केली. तसेच पुण्यात सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आता पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत आहे, असं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुमच्यासोबत आहे, असे अधिकृतरित्या तुम्ही आज जाहीर करणार का? असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की, घोषित करायला कशाला पाहिजे? आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत. त्यामुळे घोषित करण्याचा आग्रह का? हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांना विचारला पाहिजे. पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या, त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे युती झालेली आहे. तसेच शरद पवार गटाला हव्या पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या. तुम्ही आम्ही त्यांना सांगितलं की, तुम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा करा. पण आमच्याकडून हा विषय आम्ही संपवला आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शरद पवार गटासाठी तुम्ही जागा सोडली आहे, असे तुम्ही सांगत आहात, पण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की, पिंपरी-चिंचवडपुरता हा मर्यादीत मुद्दा आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची युती झालेली नाही, असे मला वाटते. त्यामुळे अजित पवारांना भाजपाला आणि अमित शहांना उत्तर द्यायचं आहे. ज्या शरद पवाराविरोधात भाजपा लढत आहे, अशा शरद पवार गटासोबत अजित पवार युती करत असतील, त्यांना अमित शहांना उत्तर द्यावं लागेल. तसेच ज्या भाजपाला नेहमीच शरद पवार गटाने विरोध केला, आज त्याच भाजपासोबत असलेल्या अजित पवारांसोबत शरद पवार का जात आहेत? याच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, मला कशाला प्रश्न विचारत आहात? असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी केला.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….