मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा; हरहुन्नरी अभिनेता- दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व, दिग्दर्शक व अभिनेता रणजीत पाटील यांचे काल दु:खद निधन झाले. ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
तरुण वयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
रणजीत पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांत ठसा उमटवला. रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे प्रेम मिळवले. त्यांच्या अभिनयात सहजता, प्रामाणिकपणा आणि वास्तववाद दिसून येत असे. विशेषतः सामाजिक विषयांवर आधारित कथा मांडण्यात त्यांची दृष्टी वेगळी होती.
दिग्दर्शक म्हणून रणजीत पाटील यांनी आशयघन विषयांना व्यावसायिक चौकटीत मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दिग्दर्शनात माणसांच्या भावनांना केंद्रस्थानी ठेवणारी मांडणी आढळते. त्यामुळे त्यांची कलाकृती केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाजाला विचार करायला लावणारे ठरले.
रणजीत पाटील यांनी रंगभूमीवर गाजत असण्याऱ्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्यांनी ‘काळे धंदे’ या वेब सिरीजमध्ये छोटी भूमिका साकारली होती. त्यांच्या पश्च्यात त्यांनी पत्नी, आई-वडिल असा परिवार आहे. त्यांच्यावर अंत्यविधी कोल्हापूर येथे होणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले.अनेक चाहत्यांनीही सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी शेअर करत त्यांना भावपूर्ण निरोप दिला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..