ठाकरे बंधू एकत्रच युतीची घोषणा करणार, बड्या उमेदवारांची नावेही जाहीर करण्याचे संकेत, BMC निवडणूक रंगतदार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे बंधू एकत्र येत निवडणुकीच्या दृष्टीने युतीची घोषणा कधी करणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे.
वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमानंतर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा जोरात सुरु आहे. मात्र अधिकृतरित्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली नसल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकाला संभ्रम आहे. बीएमसी निवडणूक संदर्भात युतीच्या घोषणेची प्रतीक्षा येत्या काही तासांत संपण्याची चिन्हे आहेत.
आगामी एक-दोन दिवसांत युतीची अधिकृतरित्या घोषणा होईल अशी शक्यता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि संजय राऊत यांनी तसे अनौपचारिक संकेत दिले आहेत. मनसेतील नेत्यांनी यासंदर्भात अधिकृतरित्या काही बोलत नसले तरी तशी शक्यता व्यक्त केलेली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितरीत्या पत्रकार परिषद घेऊन युतीचा नारळ फोडतील अशी माहिती मिळत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूकदोन्ही ठाकरे बंधूंकरिता अस्तित्वाची लढाई समजली जाते आहे. कालच नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निकालात भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सरस ठरलेली पाहायला मिळाली. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमार्फत उमेदवार निश्चितीमध्ये झालेली दिरंगाई पाहता दोन्ही ठाकरे बंधू युतीची घोषणा करून काही उमेदवारांच्या नावांची घोषणा करतील अशी पण शक्यता विश्वसनीय सुत्रांनी सांगितलेली आहे.
नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणूक निकालांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे वाढलेले बळ पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा मनसैनिक आणि शिवसैनिकांच्या उत्साहात संचार वाढायला मदत करेल, असं म्हटलं जात आहे.
‘तेच आकडे, मशिन व सेटिंग’
‘नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निकालांचे आकडेही विधानसभेच्या निकालांसारखेच आहेत. तेच आकडे, तीच मशिन आणि तेच सेटिंग. आकड्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. भाजपने मशिन विधानसभेप्रमाणेच सेट केली. त्यांनी यावेळी निदान आकडे तरी बदलण्याची गरज होती’, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी निकालानंतर केला.
‘युतीची दोन दिवसांत घोषणा’
‘मनसेशी युतीबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची रविवारी बैठक झाली असून या बैठकीत चर्चा पूर्ण झाली आहे. चर्चा व जागावाटप संपले आहे. कुणी कुठे लढायचे यावर एकमत झाले. कोणतीही अडचण दिसत नाही. येत्या एक-दोन दिवसांत यासंबंधीची रितसर घोषणा होईल’, असे ते म्हणाले.
‘मन वळविण्याचे प्रयत्न’
‘महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढावे अशी आमची व काँग्रेसची इच्छा आहे. परंतु त्यांच्या काही अडचणी आहेत. विशेषतः राज ठाकरे यांच्या संदर्भात. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व घटक एकत्र घ्यावे लागतील. काँग्रेसचे मन वळवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. अजून ७२ तास आहेत. परंतु आमच्यात कोणतीही कटुता नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….