शेतकरी कर्जमाफीबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “२०१७ आणि २०२० ला कर्जमाफी केली तरीही.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. दरम्यान आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
शेतकरी कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्य सरकारने हे कमिंटमेंट केली आहे. हे खरं आहे की आता आपल्यावर जो अतिवृष्टीचा ताण आला, त्यामुळे आपलं बजेट थोडं अडचणीत आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची यासंबंधीचा निर्णय आपण घोषित केला आहे. त्यासंदर्भात एक समिती आपण तयार केली आहे. की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा शेतकर्यांना फायदा झाला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये.”
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना मागे दोन वेळी कर्जमाफी देऊन देखील शेतकरी पुन्हा कर्जमाफी मागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की, “ही परिस्थिती पण विचारणीय आहे की, आपण २०१७ आणि २०२० ला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतो आहे. याचा अर्थ आपल्या नियोजनात कुठेतरी अडचण आहे, आपल्या कर्ज माफीत आणि एकूण शेतकऱ्यांच्या परिस्थितीत आहे. एकदम याच्यावर उपाय योजना येणार नाही. पण टप्प्या टप्प्याने काय उपाय योजना करता येतील, आणि त्या उपाय योजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी करणे असे काम ही समिती करत आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आपण घोषित केल्याप्रमाणे १ जुलै पर्यंत आपण आपली कर्जमाफीची योजना काय असेल याची घोषणा करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..