देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सरकारचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये सरकारने जी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा समर्थपणे सामना केला आहे. आम्ही महायुतीतले तिन्ही नेते एकत्रित निर्णय करतो आणि झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आपण करत असतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नुकतीच नगर परिषदेची निवडणूक झाली. आता महापालिकांची निवडणूक पार पडेल. अनेक वर्षे निवडणूक न झाल्याने स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनातही दुःख होतं पण आता निवडणुका सुरु झाल्याने आपली लोकशाही खालपर्यंत पोहचवण्यापर्यंत आणि लोकशाहीतल्या शेवटच्या संस्थेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र आणि गतिमान होणार आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्राला खूप गोष्टी भोगाव्या लागल्या आहेत-फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात म्हटलं आहे की महाराष्ट्राला खूप गोष्टी भोगाव्या लागल्या. कोव्हिडचा काळ आला. अनेक अडचणी आल्या, स्थगिती आल्या. पण या गोष्टी विसरुन जायच्या. आता आपण थांबणार नाही. आमचा प्रयत्न सकारात्मकतेने पुढे जाण्याचा आहे. आम्ही नगरपालिका निवडणुकांमध्येही विकासाचाच अजेंडा मांडला. २०२३५ चा अमृत महोत्सवी महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. पुढचा काळ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रचनात्मक कार्यातून आपण महाराष्ट्राला वेगाने पुढे नेऊ शकतो. विरोधी पक्ष आहे, सत्तारुढ पक्ष हे जरी असलं तरीही आपण सगळे महाराष्ट्र हिताचा विचार करणारे लोक आहोत. म्हणून मला सांगायचं आहे की अब आगे बढ चुकाँ हूँ मै, पिना था जितना जहर पिना पी चूँका हूँ मै, अब पग नहीं रुकनेवाले, आगे चल चुका हूँ मै, जितना पढना था तुमको पढ चुकाँ हूँ मै, अब आगे बढ चुका हूँ मै. असं मुख्यमंत्री म्हणाले.
चंद्र आहे, सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच-देवेंद्र फडणवीस
आपला महाराष्ट्र हे शक्तीशाली राज्य आहे. कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही. १०६ हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल वगैरे कुणीही शंका मनात बाळगू नये. निवडणुका आल्या की अशी टीका केली जाते. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहिल. आपलं दैवत म्हणजे छत्रपती शिवराय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दाखवला त्या संविधानाच्या मार्गाने आपण वाटचाल करत आहोत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….