आमदारांनी स्वत:च्याच मतदारसंघातील कामे रद्द केली ; माजी आमदार देवेंद्र भुयार यांचा आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- “मोर्शी मतदारसंघात आपल्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेली २९० कोटी रुपयांची जनहिताची कामे मोर्शीचे भाजपचे विद्यमान आमदार उमेश यावलकर यांनी रद्द केल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे.
ही रद्द करण्यात आलेली कामे पूर्ववत मंजूर करून मोर्शी, वरूड तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे महायुतीतीच संघर्ष उफाळून आला आहे.
आपण आपल्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून मोशी आणि वरूड तालुक्यातील विकास कामांसाठी निधी खेचून आणला. मोठ्या प्रमाणात त्यावेळी विकास कामे मंजूर झाली होती.
मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोर्शी विधानसभा मतदारसंघातील जनतेने भाजपच्या उमेदवारावर कृपा करून भरघोस मतांनी निवडून दिले, तरीही सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आपण विशेष प्रयत्न करून मंजूर करून आणलेले वरुड येथील अतिरिक्त १०० बेड रुग्णालय ५० कोटी रुपये, राजुरा बाजार येथील ३० बेड रुग्णालय ५० कोटी रुपये, मोर्शी येथील ट्रामा केयर हॉस्पिटल १५ कोटी रुपये, बेनोडा ट्रामा केयर हॉस्पिटल १५ कोटी रुपये, मोर्शी शहरातील प्रमुख रस्ते निधी ८५ कोटी रुपये, शेंदूरजनाघाट शहरातील प्रमुख रस्ते निधी ५० कोटी रुपये, वरुड, मोर्शी, शेंदूरजनाघाट येथील निधी १५ कोटी रुपये, अल्पसंख्याक निधी १० कोटी रुपये अशी सर्व २९० कोटी रुपयांची जनहिताची कामे आमदार उमेश यावलकर यांनी रद्द केली आहेत, असा आरोप माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी केला.
मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय मोर्शी, वरूड येथे नवीन ट्रॉमा केअर युनिट, वरुड, मोर्शी, तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचे असताना २९ मे रोजी शासन निर्णय काढून आरोग्य विभागाची मंजूर कामे रद्द केल्यामुळे येथील नागरिकांवर अन्याय होणार असल्याची बाब माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली आहेत.
रुग्णालयांना वैद्यकीय चाचणी आणि अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी रद्द करण्यात आलेली २९० कोटी रुपयांची कामे पूर्ववत मंजूर करून मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….