“पुढील दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री”; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण झपाट्याने बदलत आहे. आगामी महापालिका निवडणुका भाजप बहुतांश ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं जात होतं.
मात्र, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजप बहुतांश ठिकाणी युती करण्याच्या मानसिकतेत असल्याचे सांगितले जात आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक भाकीत केलं आहे. त्यानुसार पुढील दोन महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळं महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठा उलट फेर होणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची पॉवर काय आहे हे दाखवून दिलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वतंत्र निवडणुका लढणार असं सांगत होतं. आता त्यांना त्या भूमिकेवरून माघार घ्यावी लागली आहे. यामुळं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एकनाथ शिंदे यांनी आपल्या खिशांमध्ये घातला असल्याचे चित्र दिसत आहे.
ही एकनाथ शिंदे यांनी किमया साधली असून आता भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करून महापालिकेच्या निवडणुका लढणार असल्याचे सांगत आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे अमित शाह यांना भेटले आणि शिंदे यांनी अमित शहा यांना खिशात घातलं आहे ही त्यांची किमया आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही. मात्र, पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतात का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
शरद पवार हे राजकारणातील चाणक्य मानले जातात. ही वस्तुस्थिती असून ती नाकारता येणार नाही. मात्र काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी योग्य संदेश दिला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्रीपद पाडून घेतात का? हे पाहावे लागेल.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….