एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, सिडकोच्या घरांच्या किंमती कमी केल्या, अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुंबई किंवा नवी मुंबईत आपलं हक्काचं घर खरेदी करावं, अशी अनेकांची इच्छा असते. ही इच्छा अनेकांची पूर्ण होणार आहे. कारण नवी मुंबईत सिडकोच्या घरांच्या किंमतीत 10 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. सिडकोंच्या घरांच्या किंमतीत घसरण झाल्याने नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई हे शहर आधीपासूनच सुसज्ज आहे. तिथे स्वच्छता चांगली राखली जाते. तसेच हे शहर दाटीवाटीचं नाही. इथे सगळ्या सुविधा आहेत. तसेच इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा सुरु झालं आहे. त्यामुळे नागरिकांना हव्या असणाऱ्या सगळ्या सुविधा या शहरात आहे. त्यामुळे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी इथे चांगला पर्याय आहे. अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठी सिडकोने जे दर निश्चित केले होते त्यामध्ये थेट 10 टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे आता ही घरे पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे.
“सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या परिसरात तब्बल 17 हजार घरे बांधण्यात आली आहेत. या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. त्यापूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इडब्ल्यूएस आणि एलआयजी या प्रवर्गातील घरांच्या किमती 10 टक्के कमी होतील”, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत निवेदन करताना दिली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात अधिकृत आणि चांगल्या दर्जाची घरे मिळणे शक्य होणार आहेत”, अशी देखील माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….