यंदा विधानभवनातील अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात (विधानभवनात) होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यात आली आहे. याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी त्यांच्यासोबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, हिवाळी अधिवेशनाबाबतच्या तयारीचा सकाळी आढावा घेण्यात आला. त्यावेळी अनावश्यक गर्दी टाळण्याबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. व्हीआयपींना देण्यात येणाऱ्या पासेस वेगवेगळ्या रंगाचे देण्यात येत आहे.त्यांच्या प्रवेशाचे गेटही वेगळे राहतील. यासोबतच विना पाव्व्यक्तीने प्रवेश केला असेल तर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधान भवनाच्या मंत्री परिषद सभागृहात प्रा. शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनासाठी स्थानिक प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. अधिवेशन कालावधीमध्ये मंत्री, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य व अन्य मान्यवरांसाठी करण्यात आलेली निवास व्यवस्था, पुरविण्यात आलेली इंटरनेट-वायफाय सुविधा, सुरक्षा, आरोग्य आदी सुविधांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. रविभवन आणि नागभवन येथील कुटीरमध्ये देण्यात आलेल्या वायफाय व इंटरनेट व्यवस्थेबाबत माहिती घेण्यात आली. महिला आमदारांची निवास व्यवस्था, राजकीय पक्षांच्या प्रतोदांना कार्यालये उपलब्ध करून देणे आणि या सर्व ठिकाणी सुरळीत वीज पुरवठा, लिफ्ट, अग्निशमन व्यवस्था, स्वच्छता आदिंविषयी निर्देशही देण्यात आले.
या बैठकीला विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे (सचिव १), मेघना तळेकर (सचिव-२), डॉ. विलास आठवले (सचिव-३) आणि शिवदर्शन साठ्ये (सचिव-४) यांच्यासह विधानमंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानिक प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते.बैठकीनंतर सभापती व उपसभापती यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची व परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली.
– विमानांची गैरसोय, नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
सध्या विमानांची गैरसोय आहे. अधिवेशनासाठी कोणत्याही सदस्यांना उशीर होऊ नये, त्यांची गैरसोय होऊन नये ते वेळेवर पोहोचावे यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. यासोबतच परत जाताना सुद्धा १४ तारखेला रात्री आणि १५ तारखेला विशेष रेल्वेची व्यवस्था करण्याची सूचना रेल्वे विभागाला करण्यात आली होती. ती रेल्वेने मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….