मी चांगलं काम करत असल्याने माझ्या घातपाताचा कट – मनोज जरांगे-पाटील…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “माझ्याविरोधात घात करण्याचा कट रचला गेला आहे. याबाबत काही माहिती आमच्याकडे आहे. मी सरकारकडून दिलेली सुरक्षा नाकारली आहे. माझे रक्षण माझा समाज करील.’ घातपात प्रकरणाच्या चौकशीत गंभीर आरोप समोर आल्याचा धक्कादायक खुलासा जरांगे यांनी केला.
हा घातपात माजी मंत्री धनंजय मुंडेंनी करण्यास सांगितला असल्याचे त्यांनी म्हटले. ‘मग जालना जिल्ह्याच्या एसपीने गृहमंत्रालयाकडून त्यांच्या अटकेची परवानगी का घेतली नाही? कोणती शक्ती त्यांना वाचवत आहे?’ असा सवाल त्यांनी केला. तसेच, ‘अटक झालेल्या तीनही आरोपींची आणि आमचीही नार्को टेस्ट करा, आम्ही तयार आहोत. सत्य बाहेर यायला हवे. जर कारवाई झाली नाही, तर याचे परिणाम गंभीर होतील,’ असा सरकारला त्यांनी इशारा दिला.
मराठा क्रांती मोर्चाचे संघर्ष योद्धा व राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांच्या मातोश्रीनंतर चाकण (ता. खेड) येथे भेट देऊन वाडेकर कुटुंबाला सांत्वन दिले. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. स्वतःवर झालेल्या घातपाताच्या कटापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. याप्रसंगी कालिदास वाडेकर, अशोक मांडेकर, भगवान मेदनकर, विजय खरमाटे, प्रवीण करपे, बाबाजी कौटकर, कैलास पारधी, अरुण कुऱ्हे, नीलेश आंधळे, मोहन वाडेकर यांसह असंख्य मराठा कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा भवनची गरज
राज्यातील प्रत्येक तालुक्यातच नव्हे, तर प्रत्येक मोठ्या गावातही मराठा भवन असणे आवश्यक आहे. या मराठा भवनाच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या करिअरसाठी योग्य मार्गदर्शन मिळवू शकतील. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले जातील आणि आर्थिक व सामाजिक मदत पोहोचवता येईल. मराठा समाजात प्रचंड क्षमता आहे; पण ती संघटित होणे आवश्यक आहे. मराठा भवन म्हणजे केवळ इमारत नाही, तर समाजाचे विश्वासार्ह केंद्र असते. सरकारने या बाबतीत मदत करायला हवी.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….