स्वार्था साठी हापापलेल्या उमाचा आपल्याच नगरसेवकाच्या प्रभागावर दावा ; बांधकाम सभापती असतानाचे अनेक विषय चव्हाट्यावर…..
रितेश पुरोहित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “सत्तेची धून मस्तकात बसल्यानंतर काय होते याचे ताजे उदाहरण म्हणजेच पुसद मधील उमाचा प्रताप माझ्या पक्षातील कोणी नसला तरी चालेल केवळ मी आणि मी फक्त योग्य प्रभागात तिकीट मिळून आपला पक्ष व बंगल्याच्या भरोशावर निवडून कसा येतो इतकीच भूमिका याच उमाची असते माझ्या पक्षातील इतर दिलेल्या जागावर कोण निवडून येतो किंवा पडतो याशी काही देणे घेणे नाही आजपर्यंत पक्षाव्यतिरिक्त दोन भाऊंच्या भरोशावर केलेले राजकारण आज त्यांच्याच पत्त्यावर पडले आहे सर्व काही मलाच परंतु पक्षाला या उमाचा कवडीचाही फायदा आजपर्यंत झाला नाही आतापर्यंत ताई आता दिग्रस चे भाऊ अशी कास धरलेल्या मला येत्या निवडणुकीत कोणत्या प्रभागात उभा राहून हा प्रश्न समोर पडला असून प्रभाग पंधरा मध्ये मागील वेळी आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून आला त्या प्रभागावर त्यावेळेस निवडून आलेल्या नगरसेवकाचा दावा हा महत्त्वपूर्ण मानला जातो परंतु आपल्या पक्षातील त्याच नगरसेवकाला आपल्या पायाखाली घेऊन त्याच्या प्रभागामध्ये मला तिकीट द्या करिता बंगल्याचे चौकट जेजुरीला सुरू आहे इतर कोणाची युती हो की नाही परंतु आमची युती पुसदच्या भाऊ सोबत झालीच पाहिजे आणि मी पुन्हा निवडून आलो पाहिजे यावेळेस जरी गटनेता नाही झालो किंवा सभापती नाही झालो तरी चालेल परंतु नगरसेवकाची खुर्ची मला कशी मिळेल या दिशेने उमाचा प्रयत्न सुरू आहे हे जरी सर्व काही खरे असले तरी प्रत्येक वेळेस पक्षाला मागे ठेवून आपण स्वतः कसे पुढे जातो हे बघणाऱ्या या व्यक्तीकडून यावेळेस खुर्ची मिळेल की नाही हे सांगणे सध्या तरी कठीण आहे मध्यंतरी तर सर्वसाधारण पुरुष नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निघाल्याने याच उमाला नगराध्यक्षपदाची डोहाळे लागले होते परंतु शेवटी कोणी किती उड्या मारायच्या हे सर्व त्याच्या उंचीवर अवलंबून असतो सध्या किती उड्या मारल्या तरी आपण कुठपर्यंत जाऊ हे त्यांना स्वतःला कळल्यानंतर नगरसेवक होण्याकरिता सोयीचा प्रभाग शोधणे सुरू आहे सर्वच पक्षासोबत ऍडजेस्टमेंट करून मी कसा निवडून येतो याकडे यांची लक्ष आहे प्रभाग 14 मध्ये मागील वेळेस शिवसेनेचे संतोष दरणे निवडून आले होते कर्म प्राप्त बघितला असता संतोष दरणे यांनाच प्रभाग 14 मध्ये पक्षाचे तिकीट मिळवून त्यांना निवडून आणणे ही भूमिका उमा भाऊची असायला पाहिजे होती परंतु त्याच प्रभागात मला तिकीट द्या आणि निवडून आणा याकरिता स्वतः व आपल्या मालकासह बंगल्यावर येरजारा सुरू आहे सध्या च्या स्थिती प्रभाग क्र. 14 हा नवीन प्रभाग रचने नुसार आता हा प्रभाग क्र. 15 मध्ये नवीन प्रभाग बनला आहे. संतोष दरणे यांच्या घर प्रभाग क्र. 15 मध्ये गेल्याने त्यांना या प्रभागामध्ये त्यांचा पक्षांचे तिकीट मिळणे हा कर्मप्राप्त आहे परंतु उमा भाऊंनी त्यांनाही कळावे की आपल्या प्रभागातल्या जरी आपल्याला उभे राहायचे नसेल तर आपल्या स्व प्रभागातील कार्यकर्त्याला तिकीट देऊन निवडून आणण्यात मोठेपणा आहे परंतु माझ्यापेक्षा माझ्या पक्षात कोणीही मोठे नाही झाले पाहिजे हीच भूमिका यांची असल्याने जो बोयेगा वही पायेगा अशी स्थिती यांची होणार आहे स्वतःला मात्र सर्वच काही आणि कार्यकर्त्याला काहीच नाही झेंडे खुनाची जरी असले तरी चालेल पण मला माझ्या पक्षात युती करून करून मला निवडून आणा करिता जीवाचे रान करणे सुरू आहे मागील काळात हेच उमा भाऊ बांधकाम सभापती नगरपालिकेमध्ये झाले होते त्यांनी काय दिवे लावले हे पुसतकरांनी बघितले नगरपालिकेचे लाखो रुपये पोलीस स्टेशन समोर येईल भाजी मंडी वर व्यर्थ खर्च करून नगरपालिकेला आर्थिक उदंड दिला सदर जागा महसुली असताना कोणत्याही परवानग्या न घेता आपल्या बांधकाम सभापती पदाचा आव आणून या ठिकाणी बांधकाम केले परंतु ही भाजी मंडी आज नितीस बंद आहे याच विषयावर अनेकांनी आता कागदोपत्री पुरावे काढून तक्रारी करून न्याय न मिळाल्यास न्यायालयाचा दरवाजा थोटावण्याचे ठरविले आहे. तूर्तास इतकेच पॉलिटिक्स स्पेशल उद्या याबाबत पुराव्यासह या विषयासंबंधित बातमी प्रकाशित करून नियमित वृत्तमालिका चालविणारा आहे

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….