पुसदमध्ये लल्ला दिंडे यांच्या प्रयत्नाने व भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवकांचा भाजपात भव्य-दिव्य पक्ष प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रहेमान चव्हाण ; 9657176148
पुसद :- “नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुसद शहरात भारतीय जनता पार्टीच्या शक्तीप्रदर्शनासारखा भव्य युवा पक्षप्रवेश सोहळा योगा भवन येथे पार पडला. लल्ला उर्फ राधेश्याम दिंडे – भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री यांच्या नेतृत्वाखाली पुसद शहर आणि ग्रामीण भागातील 245 उत्साही युवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून पक्षाच्या विजयाच्या संकल्पास अधिक बळ दिले.

हा भव्य प्रवेश सोहळा भाजप जिल्हा समन्वयक मा. नितीनभाऊ भुतडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख उपस्थिती पुसद जिल्हा निवडणूक प्रमुख माजी आमदार निलय नाईक यांची होती. तसेच माजी जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे, वि. जिल्हाध्यक्ष सौ. आरती फुफाटे, शेखरजी वानखेडे, रोहित वर्मा, निलेश पेन्शनवार, निखिल चिद्दरवार, विश्वास भवरे, आदित्य माने, अमय नाईक, दिपाली जाधव, अनिरुद्ध पाटील, रूपाली जैस्वाल, बळवंतराव नाईक, रेशमाताई लोखंडे, अरुणाताई जाधव, अश्विनजी जयस्वाल आदी भाजपचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमुख वक्ते म्हणून बोलताना मा. आमदार निलय नाईक म्हणाले,
> “लल्ला दिंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा युवा महाप्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये – जि.प., प.स. आणि नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.”
तर जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात म्हटले,
> “लोहे को काटने के लिये लोहा चाहिये – लल्ला दिंडे यांचा पक्षप्रवेश हीच ती ताकद आहे जी विरोधकांना धडा शिकवेल!”
यावेळी नवनिर्वाचित जिल्हा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वितरण सुद्धा करण्यात आले
कार्यक्रमादरम्यान “आपकी बार भाजप सरकार” या घोषणा देत युवकांनी परिसर दणाणून सोडला. उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केले की या भव्य युवा महाप्रवेशामुळे भाजपची ताकद आता पुसदमध्ये द्विगुणित झाली आहे आणि विरोधकांच्या गोटात स्पष्टपणे अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओमप्रकाश शिंदे (जिल्हा महामंत्री, किसान मोर्चा) यांनी कुशलतेने केले, तर आभार प्रदर्शन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओबीसी नेते शेखर वानखेडे गुरु उंचाडे नितीन वारकड कपिल जाधव पवन राठोड नेहाल वानखेडे राजू काकडे सुधीर धाड अंकुश राठोड अक्षय पांडव निखिल राठोड शिव हूलकाने आकाश दिंडे विशाल कवडे मुन्ना राठोड आकाश मारकड आदी शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..