पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या..? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “हरियाणाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी IPS पूरन कुमार (IPS Puran Kumar) यांच्या आत्महत्येमुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. 7 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या घरातील साऊंडप्रूफ बेसमेंटमध्ये सर्व्हिस पिस्तूलाने गोळी झाडून आत्महत्या केली.
मात्र मृत्यूनंतरही त्यांचा पोस्टमॉर्टम (Postmortem) अद्याप झाला नव्हता. त्यांच्या सुसाइड नोट (Suicide Note) मध्ये त्यांनी 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत त्यांना जबाबदार ठरवले आहे.
कोण होते IPS पूरन कुमार? (Who Was IPS Puran Kumar)
पूरन कुमार हे मूळचे आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथील होते आणि ते अनुसूचित जाती (SC) समुदायातून आले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी राज्याच्या महानिरीक्षकांवर (DGP) भेदभाव आणि मानसिक छळाचे आरोप केले होते. त्यांच्या मते, 2020 पासून त्यांच्यावरील अन्याय सुरू झाला होता. त्यांनी म्हटले की, त्यावेळचे DGP मनोज यादव यांनी त्यांच्या बदलीनंतर सतत अपमान आणि छळ केला.
सुसाइड नोटमध्ये त्यांनी नमूद केले की काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या सुट्ट्या नाकारल्या, वडिलांना भेटण्याची संधी दिली नाही. तसेच त्यांच्याविरोधात खोट्या तक्रारी (Fake Complaints) दाखल केल्या गेल्या. नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांच्याकडून सरकारी वाहन (Official Vehicle) देखील काढून घेण्यात आले. आता हा छळ सहन होत नाही, म्हणून मी सगळं संपवण्याचा निर्णय घेतलाय असं पूरन कुमार यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय.
मात्र अशा प्रकारची आत्महत्या करणारे पूरन कुमार हे काही पहिलेच आयपीएस अधिकारी नाहीत. त्यांच्या आधीही दोन आयपीएस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
गेल्या 10 वर्षांतील IPS आत्महत्या (IPS Suicides in Last 10 Years)
2015 ते 2025 या कालावधीत देशात एकूण तीन IPS अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे नोंदवले गेले आहे.
1.केशशी कुमार (K. Sashi Kumar) – 2012 बॅच IPS अधिकारी, आंध्र प्रदेशातील पाडेरू (Paderu) येथे SP पदावर कार्यरत असताना जून 2016 मध्ये सर्व्हिस रिव्हॉल्वरने आत्महत्या केली. त्यावेळी त्यांचे वय फक्त 29 वर्षे इतकं होतं.
2. हिमांशू रॉय (Himanshu Roy) – 1988 बॅच महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी, मुंबई पोलिसांत जॉईंट कमिशनर (क्राईम) आणि नंतर ATS प्रमुख म्हणून कार्यरत. त्यांनी 11 मे 2018 रोजी कॅन्सरच्या दीर्घ आजारानंतर आत्महत्या केली.
3. पूरन कुमार (Puran Kumar) – हरियाणातील 2013 बॅच IPS अधिकारी. 7 ऑक्टोबर 2025 रोजी आत्महत्या; सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.