भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भगतसिंग यांची जयंती साजरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी स्थानिक सुभाष वार्ड पुसद येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भगतसिंग जयंती निमित्त आदरांजली पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विलास केवटे होते. कार्यक्रमाचे संचालन निखिल टोपलेवार यांनी केले, तर आभार साहेबराव राऊत यांनी वक्त केले.
कार्यक्रमा दरम्यान झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर यांची सध्य स्थिती, तसेच बांधकाम कामगार यांच्या होत असलेल्या बोगस नोंदणी संदर्भात चर्चा करण्यात आली. आणि वरील प्रश्नांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे लढा उभारण्यात येईल असे प्रतिपादन पक्षाचे तालुका सचिव कॉ अमोल गवरशेट्टीवार यांनी केले.
सदर कार्यक्रमाला कॉ. सुरेंद्र गडदे, साहेबराव राऊत, रमेश तूपसुंदरे, भाऊराव इंगोले, शे.शफीक अ. मन्नान, मधुकर इंगोले, शंकर लोखंडे, डॉ. खुर्शीद वजुद हे प्रामुख्याने उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..