राजकुमार भगत यांची आझाद समाज पार्टी युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीच्या विविध उपक्रमांतून आपली वेगळी छाप सोडणारे राजकुमार भगत यांची आझाद समाज पार्टी युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
यांची निवडीची घोषणा डॉ.राहुल दाभाडे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख तथा विदर्भ प्रभारी आझाद समाज पार्टी युवा मोर्चा यांनी केली असून निवड पत्र भीम आर्मी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले.
या नियुक्तीबाबत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून, जिल्ह्यातील युवकांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि समाजकारणात सक्रीय सहभागासाठी ही निवड मोलाची ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राजकुमार भगत हे व्यसनमुक्ती चळवळ, पर्यावरण संवर्धन व शिक्षण या क्षेत्रात सातत्याने काम करत आहेत. विविध शिबिरे, जनजागृती मोहिमा व सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी युवकांना प्रेरित केले आहे.
त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आझाद समाज पार्टी युवा मोर्चा नव्या जोमाने कामाला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.