बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद येथील विद्यार्थी शैक्षणिक सर्वेसाठी श्रीमती गंगाबाई नाईक शाळा धनसळ या शाळेमध्ये….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- दिनांक 17 सप्टेंबर बुधवार रोजी इंजिनीरिंग कॉलेज येथील विद्यार्थी शैक्षणिक सर्वे करीता श्रीमती गंगाबाई नाईक माध्यमिक शाळा धनसळ येथे आले, सर्वेचा विषय होता डिजिटल इनपॉवरमेंट यातून त्यांनी विध्यार्थ्यांना डिजिटल अँप बद्दल माहिती पॉवर पॉईंट च्या माध्यमातून दिली यामध्ये डिजिटल पैसे आदन -प्रधान, कृषी विषयक पीक विमा अँप, दिक्षा अँप, फोन पे, गूगल पे,बायजूस, AI अभ्यासात टेकनॉलॉजी चा वापर सोबतच टेकनॉलॉजी फायदे तोटे या बद्दल माहिती दिली आणि डिजिटल फ्रॉड बद्दल सुद्धा माहिती दिली.
विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारून त्याच्या समस्या चे समाधान कारक उत्तर दिले विद्यार्थ्यां कडून प्रश्नावलीच्या माध्यमातून फीडबॅक घेतला आजच्या काळात पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर विध्यार्थीनी विविध स्टूल समजून घेणे शिकणे महत्वाचे आहे असे सांगितले
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोपाल एम चव्हाण सर (मुख्याध्यापक ) हे होते. कार्यक्रमाचे संचालन श्री साखरे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कू प्राजक्ता दशरथ मोरे हिने केले, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय येथील बी ई द्वितीय वर्षाचे
संकेत चव्हाण,शिवम तावडे,पवन अढाव,प्रशांत इंगळे,विवेक कांबळे,शिवानी पतंगराव,प्राजक्ता मोरे,वेदिका कुळे,सायली वाकोडे,अनुष्का धुपारते उपस्थिती होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अमोल कांबळे सर यांनी केल तर शाळेचे मुख्याध्यापक श्री गोपाल चव्हाण यांनी सुद्धा आलेल्या सर्व टीमचे आभार मानले.