IPS अंजना कृष्णा प्रकरणी CM फडणवीस तुमच्यावर नाराज? अजित पवारांनी खरं सांगून टाकलं, ‘त्यांनी मला…’

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील व्हायरल ऑडिओ कॉलची दखल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत नाराजी जाहीर केल्याचं वृत्त समोर आलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी अजित पवारांकडे बोलून दाखवली असल्याचंही बोललं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला होता. यानंतर आता अजित पवारांनी यावर भाष्य केलं असून, हे वृत्त फेटाळून लावलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आम्हा तिघांमध्ये सर्व काही चांगलं सुरु असल्याचं म्हटलं आहे.
“माझं काम दाखवण्यापेक्षा नको त्या गोष्टी दाखवण्यात रस आहे. मग तेच उगाळत बसता. मी मागील 35 वर्षं काम करत असताना कशाप्रकारे वागतो हे विचारा. उत्खनन बेकायदेशीर होतं की नाही याबाबत सरकार निर्णय घेईल. मुख्यमंत्री खंबीर आहेत, त्यामुळे काळजी करु नका,” असं अजित पवार म्हणाले आहेत.
“मला जे उत्तर द्यायचं होतं ते मी दिलं आहे. मी ट्विट केलं असून, मुख्यमंत्र्यांनीही अजित पवारांनी जी भूमिका मांडायची ती मांडली असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्याची नोंद घेतली आहे,” असंही ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी फडणवीसांमध्ये आणि माझ्यामध्ये नाराजी नाही हे स्टॅम्पवर लिहून देऊ का? अशी विचारणा केली. “आम्ही एकत्र बसतो तेव्हा कधीही तसं जाणवलं नाही. मुख्यमंत्री विश्वास देऊन काम करतात. त्यांना चांगला अनुभव आहे, प्रशासन चांगल्या प्रकारे चालवतात. एकनाथ शिंदे यांचीही कारकिर्द पाहिली तर प्रश्न तडीस जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा तिघांचा प्रयत्न असतो. आमच्या तिघांचं व्यवस्थित चांगलं सुरु आहे”.
भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल विचारण्यात आलं असता अजित पवारांनी सांगितलं की, “140 कोटी जनता असल्याने वेगवेगळे मतप्रवाह, विचार असणार. आपण एकमेकांचे शत्रू म्हणून वागत असताना सकारात्मक प्रतिसाद दिला, पण समोरुन प्रतिसाद आला नाही; खिलाडू वृत्ती पाहावं असं म्हणणारेही आहेत. जितके लोक तितकी मतं असतील. कोणी कसा विचार करावा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा तिथे घेण्यात आला आहे”.
1) व्हिडिओ कसा व्हायरल झाला आणि का?
व्हिडिओ कार्यकर्त्यांनी स्पीकरवर ठेवून रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर (X, फेसबुक) अपलोड केला. तो ४ सप्टेंबर २०२५ रोजी व्हायरल झाला. कारण: ते एका तरुण महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावण्यासारखे वाटले आणि अवैध खननाच्या संरक्षणाचा आरोप झाला. लाखो व्ह्यूज मिळाले आणि #AnjanaKrishna #AjitPawar ट्रेंड झाले.
2) राजकीय प्रतिक्रिया काय आहे?
विपक्ष (शिवसेना-यूबीटी, एनसीपी-शरद पवार गट): संजय राऊत यांनी “अवैध खननाचे संरक्षण” असा आरोप केला आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे संरक्षणाची मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी “संविधानावर हल्ला” म्हटले. रोहित पवार यांनी “अजितदादांचा बोलण्याचा प्रकार चुकीचा समजला गेला” असे म्हटले.
एनसीपी (अजित गट): सुनील तटकरे यांनी “व्हिडिओ जाणीवपूर्वक लीक केला” असे म्हटले. अमोल मिटकरी यांनी सुरुवातीला अंजना यांच्या शैक्षणिक आणि जाती प्रमाणपत्रावर शंका उपस्थित केली, पण नंतर माफी मागितली आणि ट्विट काढले.
3) अजित पवार यांचे स्पष्टीकरण काय?
५ सप्टेंबर २०२५ रोजी अजित पवार यांनी X वर पोस्ट करून सांगितले: “माझा हेतू कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करणे नव्हता, तर तणावपूर्ण वातावरण शांत करण्याचा होता. मी पोलिस दलाला, विशेषतः महिला अधिकाऱ्यांना आदर देतो. अवैध खननावर कठोर कारवाई होईल.” त्यांनी पारदर्शक शासनाची वचनबद्धता दर्शवली.