तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट आहे का..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान निर्माण झाले असून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे.
हवामान विभागाने आज (१३ सप्टेंबर) मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर इतर जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जाहीर केला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे तयार झाले असून, त्यातून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान स्थिती काय?
बंगालच्या उपसागरात ओडिशा-आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत चक्राकार वारे तयार होऊन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
ही प्रणाली उद्या जमिनीवर येण्याची शक्यता असून, त्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे.
कमी दाबाचा पट्टा पंजाबपासून दक्षिण-मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे.
मागील २४ तासांत नांदेडच्या किनवट येथे तब्बल ८० मिमी पाऊस, तर ब्रह्मपुरी व वर्धा येथे ३३ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली.
कोणत्या जिल्ह्यात अलर्ट
ऑरेंज अलर्ट (जोरदार पाऊस व वादळी वारे): लातूर, नांदेड
यलो अलर्ट (विजांसह हलका ते मध्यम पाऊस): सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा
मान्सूनचा परतीचा टप्पा सुरू असून राज्यातील अनेक भागांत पाऊस व वीजांचा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पिकांचे संरक्षण करून नुकसान टाळावे, असे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* शेतातील पाणी साचू देऊ नका; पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या.
* पावसाळी वातावरणात रासायनिक फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी.
* विजांच्या कडकडाटात शेतात काम टाळावे व सुरक्षित स्थळी थांबावे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..