अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, १८ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सुप्रीम कोर्टाने अरुण गवळीला १८ वर्षांनंतर जामीन मंजूर केला.
नागपूर मध्यवर्ती कारागृहातून गवळीची सुटका झाली.
२००७ मध्ये शिवसेना नगरसेवकाच्या हत्येत जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
वाढते वय आणि तुरुंगवासाचा कालावधी लक्षात घेऊन न्यायालयाने जामीन दिला.
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. मागच्या गेटने पोलिसांनी मीडियापासून लपवत अरुण गवळीची सुटका केली. अरुण गवळीची तब्बल १८ वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज अरुण गवळीची तुरूंगातून सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे अरुण गवळीचे व्हिडीओ समोर आले आहेत.
मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणामध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. नागपूर कारागृहामध्ये अरुण गवळी शिक्षा भोगत होता. या प्रकरणात अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आज त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली.
नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात गेल्या १८ वर्षांपासून अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. अरुण गवळीने दीर्घ तुरुंगवास आणि वाढते वय लक्षात घेऊन न्यायालयाकडे जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. अरुण गवळीचे ७६ वर्षे आहे. त्याने केलेल्या अर्जावर सुनावणी करत सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता.
अरुण गवळीने जन्मठेप प्रकरणी १७ वर्षे कारागृहात शिक्षा भोगली. त्याचे वय ७६ वर्षे झाले. वयाचा विचार करून कोर्टाने त्याला जामीन दिला. सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर आज त्याची तुरूंगामधून सुटका झाली. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आल्यानंतर अरुण गवळीचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. पांढरा शर्ट, पांढरी पँट, पांढरी टोपी आणि पांढऱ्या रंगाची चप्पल अशा लूकमध्ये अरुण गवळी दिसला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..