भुजबळ नाराज म्हणजे मराठा आरक्षणाचा जीआर पक्का – मनोज जरांगे पाटील….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
छ. संभाजीनगर :- “मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून मराठा समाजाशी संवाद साधला.
भुजबळ नाराज म्हणजे आरक्षणाचा जीआर पक्का आहे, असे जरांगे म्हणाले
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण मिळेल, असे आश्वासन दिले.
कुणबी प्रमाणपत्रासाठी गॅझेट व जमीन नोंदींच्या आधारे प्रक्रिया होईल, असेही स्पष्ट केले.
मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत, म्हणजे मराठा आरक्षणाचा जीआर पक्का आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ते छत्रपती संभाजीनगरमधील रूग्णालयातून बोलत होते. पाच दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर गॅलेक्सी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना दोन आठवडे आराम कऱण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मराठा बांधवांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. कुणावरही विश्वास ठेवू नका. प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना हमखास आरक्षण मिळणार असल्याचा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
मी फक्त नाममात्र, सर्व मेहनत समाजाची – जरांगे
शेवटी काहीही होऊ दे.. माझ्या मराठी बांधवानी ही लढाई जिंकली. अनेक शतकांपासूनची प्रतीक्षा होती. शेवटी त्या लढाईल मराठ्यांनी यश पदरात पाडून घेतलेय. ३ जीआरचे यश समाजाचे आहे, मी फक्त नाममात्र आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र… शब्दावर विश्वास ठेवा अन् ठेवलाय आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सर्व मराठे आरक्षणात जाणार म्हणाजे जाणार, त्यावर शंका ठेवायची नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत, म्हणून गॅझेटियर लागू करायचे आहे. १८८१ पासून सरकारने मराठ्यांच्या हिताची एकही ओळ लिहिली नव्हती. हक्काचे गॅझेट असूनही सरकारने एक ओळही दिली नव्हती. फक्त संयम आणि शांतता ठेवून शांत डोक्याने विचार करा. एकाद्या विदूषक, अविचारी माणासावर विश्वास ठेवून संयम ढसळून घ्यायचा नाही, असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ?
निर्णय घेताना मी एकटा निर्णय घेत नाही. सात कोटी गोरगरीब जनता आणि मी निर्णय घेतो. काहींचे पोट यासाठी दुखत असते, आता त्यांच्या हातातून सर्व गेले. ज्यांना आरक्षणावर, गॅझेटवर राजकारण करायचे होते, ज्यावर जीवन जगत होते, ते सर्व आता कोलमडायला लागले. मग आता काय करायचे, काहीतरी बोलायचे. हे कधीच आपल्या बाजूने बोलले नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कुठलाही निर्णय सुरूवातीचे आठ ते १५ वाटते हे करायला पाहिजे नव्हते. पण मी मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणावाचून राहणार नाही, हे डोक्यात ठेवा अन् आनंदी राहा. कुणाचे ऐकूण आपलं भलं होणार नाही. आणखी खूप टोळ्या उठणार आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
ज्याच्या नोंदी नाही, त्याच्यासाठी तिघांची समिती केली. गाव स्तरावर, तालुका स्तरावर समिती करण्यात आली. हैदराबादमध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्यातील मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी तिघांची समिती केली. ज्यांच्याकडे जमीन नाही. त्यांनी कुणाची बटाईने जमीन केली असेल, त्याचे हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार.. प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे, असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला..
ज्याच्याकडे जमीन आहे, त्याच्या सातबारावर.. तिघाजणांच्या सदस्यांनी ताबडतोड वर्ग करून प्रमाणपत्र दिले जाणार.. हैदराबाद गॅझेटेयरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्या यावे, यासाठी जीआर आहे. शंका, कुशंका डोक्यात ठेवण्याची गरज नाही. मी तुमचं का वाटोळं करेन. मराठा समाजाचे मी का वाटोळं करणं. मी आणि समाज सध्या आनंदी आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
कुणावरही विश्वास ठेवायचा नाही…
पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाडा आरक्षणात गेला तर खाली काय राहिले. आपल्याला बोलायला काहीच राहिले नाही. कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही. तुमचा आणि माझा विश्वास राहिला नाही पाहिजे असा काहींचा उद्देश आहे. तो तुम्ही ढळू देऊ नका. तुम्ही मोठं झालेले पाहिजे. गैरसमज असेलच तर मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेय, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.