पुसद उपोषणाला बिरसा ब्रिगेडचा पाठिंबा ; शासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा ; आदिवासी विद्यार्थ्यांच्या पदभरतीच्या मागण्यांसाठी बिरसा ब्रिगेड मैदानात ; रिक्त पदभरती रखडल्याने समाज विकासापासून वंचित ; बिरसा ब्रिगेडचा इशारा ; आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला बिरसा ब्रिगेडचा पाठिंबा ; “प्रशासनाला सळो की पळो करून सोडू” :- मारोती भस्मे अध्यक्ष बिरसा ब्रिगेड….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रहेमान चव्हाण :- 9657176148
पुसद :- तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या साखळी उपोषणाला आज बिरसा ब्रिगेडच्या वतीने जोरदार पाठिंबा देण्यात आला. विद्यार्थ्यांची पदभरती न होणे म्हणजे फक्त आदिवासी विद्यार्थ्यांचेच नव्हे, तर संपूर्ण समाजाचे विकासापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप मारोती भस्मे अध्यक्ष बिरसा ब्रिगेड यानी यावेळी केला. शासनाने तातडीने दखल घेऊन रिक्त पदांची भरती पूर्ण करावी अन्यथा “प्रशासनाला सळो की पळो करून सोडू” असा इशारा मारोती भस्मे अध्यक्ष बिरसा ब्रिगेड यांनी यावेळी दिला.
आज सकाळी 11 ते एक वाजेपर्यंत उपोषणकर्त्या विद्यार्थ्यासोबत बिरसा ब्रिगेडचे विदर्भ सचिव नानाभाऊ बेले, तालुका अध्यक्ष मारोती भस्मे, विद्यार्थी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष अक्षय व्यवहारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. पोषण स्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला तसेच शासन प्रशासनाला इशारा दिला की, जर मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत तर बिरसा ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. असा इशारा यावेळी बिरसा ब्रिगेडचे विदर्भ सचिव नानाभाऊ बेले यांनी दिला.
आज चौथ्या दिवशीही उपोषणाच्या या रणांगणात ठाम उभे राहून संपूर्ण आदिवासी समाजाच्या भविष्याकरता विद्यार्थी संघर्ष करत आहात. हा संघर्ष केवळ नोकरीसाठी नाही, तर आपल्या पुढच्या पिढीला न्याय, सन्मान आणि विकास मिळावा यासाठी आहे.हा त्याग, तुमचा हा संघर्ष समाज नक्कीच विसरणार नाही. संपूर्ण आदिवासी समाजाच्या आशा आणि आकांक्षांचे तुम्ही प्रतीक आहात. उपोषणातील त्रास, भूक, थकवा – हे सारे इतिहासात नोंदले जाणार आहे. अशी आदरयुक्त उद्गार बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारोती भस्मे यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांप्रती काढून त्यांना प्रेरित केले.
फक्त सत्याची ज्वाला आणि न्यायासाठी लढण्याची जिद्द. तीच जिद्द आज उपोषणकर्त्यांच्या डोळ्यांत दिसते.या मार्गात अडथळे असतील, पण विजय नक्कीच आपला होणार आहे. कारण अन्याय कितीही मोठा असला, तरी एक दिवस सत्याच्या आणि जनतेच्या लढ्यापुढे तो नक्कीच कोसळतो.म्हणून उभे रहा, ठाम रहा. समाज तुमच्या पाठीशी आहे. बिरसा ब्रिगेड तुमच्या लढ्यात सोबत आहे. आजचा त्याग उद्याच्या पिढीला न्याय देईल. आणि उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी केलेला संघर्ष इतिहासात नव्या उलगुलानाची नोंद करून जाईल. असा आंदोलना प्रति विश्वास बिरसा ब्रिगेडचे मारोती भस्मे यांनी उपोषण करते यांना भेटून व्यक्त केला.
साखळी उपोषणाचा चौथा दिवस
पुसद तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी 16 ऑगस्ट 2025 पासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली असून आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवलेले तब्बल १२,५२० पदे दीर्घकाळ रिक्त असल्यामुळे व त्यावर कोणतीही भरती प्रक्रिया न झाल्याने हजारो आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये अनुसूचित जमातीतील रिक्त पदांची तातडीने भरती करणे, शासन निर्णय २०१६ नुसार सशर्त वैधता (Conditional Validity) प्रमाणपत्र मान्य करणे तसेच एकूण ४८,००० रिक्त पदांवर त्वरित भरती प्रक्रिया हाती घेणे यांचा समावेश आहे. यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी ठोस व वेळबद्ध धोरण जाहीर करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनाला स्थानिक आदिवासी संघटनांचेही समर्थन मिळाले असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. पुसद तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले हे साखळी उपोषण आता जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.