अलखैर फाउंडेशन तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त वृद्धा आश्रम , उपजिल्हा रुग्णालय , बस स्थानक येथे खिचडी व फळ वाटप….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथिल अलखैर फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील बाबासाहेब नाईक वृद्धाआश्रम येथील निराधार लोकांना व उपजिल्हा रुग्णालय , बस स्थानक येथिल लोकांना मोफत खिचडी व फळ वाटपाचे यशस्विरित्या कार्यक्रम करण्यात आले आहे. या फाउंडेशनने प्राथमिक शाळेत गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केले होते. या फाउंडेशनने निस्वार्थ भावनाने गोरगरीब जनतेच्या न्यायहक्का साठी धर्मनिरपेक्ष विचारधारेची बांधिलकी लक्षात घेऊन काम करते.
कोरोना काळात ही गोरगरीब नागरिकांना निस्वार्थ भावनाने धान्याची किटचे वाटप करून आदर्श निर्माण केला आहे महागाई च्या काळात ही गोरगरीब रुग्णांना रुग्णवाहिका अतिअल्प दरात उपलब्ध करून रूग्णाची सेवा करीत आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील रुग्णाना व बाबासाहेब नाईक वृद्धा आश्रम येथिल निराधार लोकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त मोफत खिचडी व फळ किटचे वाटप करण्यात आले आहे या फाउंडेशनला अधिक गती देण्यासाठी सर्व स्तरावर मदत करण्याचे आव्हान फाउंडेशनचे अध्यक्ष गुलाम अहेमद यांनी केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहम्मद रेहान सचिव , सोहेल अब्बास , सैय्यद सज्जाद , सारीम खान , उमर अली , मुशीर खान , मिर्झा मलिक यांनी अथक परिश्रम घेतले.