पुसद तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून मदत जाहीर करा ; पुसद मनसेचे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- तालुक्यात गेले तिन-चार दिवसात पावसामुळे झालेल्या नुकसानीमध्ये शेती, घरे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः काही भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदी व नाल्याकाठच्या भागांमध्ये पूर आल्याने शेती पाण्याखाली गेली आहे आणि जमिनी खरडून गेल्या आहेत. पावसामुळे काढणीला आलेले मूग, उडीद, हळद, सोयाबीन, कपाशी, तूर आदींसह भाजीपाल्यालाही मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अचधान्य, गृहोपयोगी साहित्य, कपडे आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचंही मोठे नुकसान झाले असून काही घरांची पडझड झाली आहे. या आपत्तीमुळे नागरिकांच्या जीवनावश्यक गोष्टींवर शेतकऱ्यांच्या शेतजमीनी व पिकावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यांना पुनर्वसनाच्या दृष्टीनं तातडीने मदतीची आवश्यकता आहे.
करीता, पुसद तालुक्यात पावसाने व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने सव्र्व्हेक्षण करुन नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी, करिता निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष संदीप लांडे,शहर अध्यक्ष आकाश रहाटे तालुका उपाध्यक्ष रवी सूर्य,तालुका उपाध्यक्ष अंकुश आडे,शहर उपाध्यक्ष कुणाल डहाळे,विभाग अध्यक्ष भावसिंग राठोड,विभाग अध्यक्ष अभिषेक वंजारे व किसान सभेचे सुरेंद्र गडदे शंकर राठोड आदी जण उपस्थित होते