इंडिया आघाडी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार? तामिळनाडूतील खासदाराचं नाव आघाडीवर, भाजपच्या रणनीतीला उत्तर?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “इंडिया आघाडीच्या घटकपक्षांची उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी आज सायंकाळी बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून तामिळनाडूचे द्रमुकचे राज्यसभा खासदार तिरुची सिवा यांचं नाव आघाडीवर आहे.
तिरुचीसिवा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न अयशस्वी होऊ शकतो. भाजपनं पुढील वर्षी होणारी तामिळनाडूची विधानसभा निवडणूक लक्षात घेत सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केल्याचं बोललं जातंय. यामुळंभाजपनंद्रमुक, अण्णाद्रमुक आणि काँग्रेसपुढं धर्मसंकट निर्माण झालं होतं. द्रमुकनं राधाकृष्णन यांना पाठिंबा नाही दिला तर त्यांच्यावर टीका केली जाऊ शकते. मात्र, तामिळनाडूमधीलच नेता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार असल्यास त्याची तीव्रता कमी होऊ शकते. दुसरीकडे अण्णाद्रमुकलाएनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही.
द्रमुकचे तामिळनाडूमधील राज्यसभा खासदार तिरुचीसिवा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यामुळंद्रमुक आणि काँग्रेसला तामिळनाडूच्या राजकारणात फार अडचण येणार नाही. एनडीएनंसीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर इंडिया आघाडीकडून बिहारमधील नेत्याला उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चा होत्या. मात्र, सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर द्रमुकनं तामिळनाडूतील नेत्याचं नाव जाहीर केलं जावं, अशी भूमिका घेतली.
द्रमुकच्या भूमिकेला काँग्रेसनं सहमती दर्शवली असल्याची माहिती आहे. तिरुचीसिवा हे तामिळनाडूमधील असून द्रमुकचे राज्यसभा खासदार आहेत. विरोधी पक्षांकडे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्या इतकं संख्याबळ नसलं तरी तिरुचीसिवा यांना उमेदवारी देत तामिळ अस्मितेच्या नावावर मतदारांपर्यंत संदेश देण्याचा प्रयत्न केला जाईल.
दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विरोधी पक्षांसोबत संपर्क साधला जात असून पाठिंबा देण्याचं आवाहन केलं जात आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांकडून मतदान केलं जातं. लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून एनडीएकडे 427 खासदार आहेत. तर, इंडिया आघाडीकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून 355 खासदार आहेत. लोकसभेत एनडीएकडे 293 आणि राज्यसभेत 134 खासदार आहेत. तर, इंडिया आघाडीकडे लोकसभेत 240 आणि राज्यसभेत 106 खासदार आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयासाठी बहुमताचा आकडा 392 इतका आहे.
दरम्यान, काल सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना फोन केला होता. आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडणार की एनडीए आणि इंडिया आघाडी आमने सामने येणार हे पाहावं लागेल.