उपराष्ट्रपती पदासाठी NDA चा उमेदवार जाहीर, विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरु, ‘या’ राज्यातील उमेदवार देण्याची सूचना….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “भाजपप्रणित एनडीएनं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एनडीएतील घटकपक्षांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील उमेदवाराची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांना अधिकार दिले होते.
त्यानुसार भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक काल पार पडली. या बैठकीनंतर सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आता विरोधी पक्षांकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपकडून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, त्याला विरोधी पक्ष म्हणजेच इंडिया आघाडी प्रतिसाद देणार का हे पाहावं लागेल.
विरोधकांचा उमेदवार कोण असणार?
भाजपकडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली आहे. यानंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये हालचाली वाढल्या आहेत. अजूनपर्यंत विरोधी पक्षांकडून कोणत्याही नावाची घोषणा केलेली नाही. मात्र, तामिळनाडूतूनकोणत्यातरी नेत्याला उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संधी द्यावी, अशा सूचना दिल्या जात आहेत, असं वृत्त आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सूत्रांच्या हवाल्यानुसार सांगण्यात आलं की तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकनं राज्यातील एखाद्या नेत्याला उमेदवार म्हणून उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, यासंदर्भातद्रमुककडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. काही बातम्यांनुसार एनडीएनंसीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी NDA नं मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याशी चर्चा केली होती.तामिळनाडूत पुढील वर्षी मार्च-एप्रिल 2026 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील घडामोडी चर्चेत आहेत.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 21 ऑगस्टपर्यंत आहे. तर, मतदान 9 सप्टेंबरला होणार आहे. विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार दिला जातो का ते पाहावं लागेल. जर, इंडिया आघाडीनं उमेदवार देण्याच्या निर्णय घेतला तर येत्या दोन दिवसात तो जाहीर केला जाऊ शकतो.
सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी,भाजपचंधक्कातंत्र
भाजपनंमहाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. राधाकृष्णन आरएसएसशी संबंधित आहेत. जनसंघामध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. पश्चिम तामिळनाडूमधील गौंडर समुदायातील ते आहेत.
भाजपचेबिनविरोधचे प्रयत्न
भारतीय जनता पार्टीनं सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना फोन केल्याची माहिती आहे. यावेळी उपराष्ट्रपती निवडणूक बिनविरोध होण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.