‘शिंदेंना लॉटरी लागली, पण ती टिकवता आली पाहिजे…’ गणेश नाईकांचे सूचक विधान; भाजपकडून भाईंना दुय्यम वागणूक..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या काही दिवसांपासून महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे. यातच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये काही निर्णयांवरुन तसेच वादग्रस्त मंत्र्यांमुळे विसंगती दिसून येत आहे.
यातच आज राज्याचे वनमंत्री तथा भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंबाबत मोठे भाष्य केले आहे. ‘एकनाथ शिंदेंना तर लॉटरी लागली, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
गणेश नाईक म्हणाले, लॉटरी लागली ही आनंददायी गोष्ट आहे. मात्र कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असे वक्तव्य गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केले आहे. पालघर जिल्ह्यातील दुर्वेश येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
पालघरसह एकत्रित असलेल्या ठाणे जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो होतो. त्यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे वडील विष्णु सवरा, खासदार चिंतामण वनगा हे देखील जिल्हा नियोजनाच्या बैठकीत असायचे. विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे आमदार एकनाथ शिंदे हे सुद्धा त्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत असायचे. मात्र एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, प्रत्येकाच्या नशिबाचा खेळ आहे. प्रत्येकालाच लॉटरी लागते असे होत नाही, एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली याचा मला आनंद आहे. पण प्रत्येकाला कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमावलं, कसं कमावलं यापेक्षा ते टिकवणे महत्त्वाचे आहे कसे टिकवता यावर जनसामान्यांची नजर असते, असे सूचक विधान गणेश नाईकांनी केले.
दरम्यान, एकनाथ शिंदेंचे वरचेवर दिल्ली दौरे वाढले आहेत. महायुतीत लक्ष घालण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान आणि अमित शहांकडे केली आहे. पण यानंतही महायुतीत परिस्थिती जैसे थे च आहे. एकनाथ शिंदेंच्या वादग्रस्त मंत्र्यामुळेच तसेच महायुतीच्या खात्यांतील अंतर्गत वादामुळे शिंदेंना दिल्ली गाठावी लागल्याच्या चर्चा आहेत. पण महायुतीतील वादावर तोडगा निघणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..