लवकरच प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार NCC चे प्रशिक्षण ; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेयांनी एक मोठी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यात देशाविषयी आदरभाव निर्माण व्हावा यासाठी एनसीसीच्या (राष्ट्रीय छात्र सेना) धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे.
या संदर्भात एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. राज्यात एनसीसीची प्रशिक्षण केंद्रे वाढवावीत यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
राज्यात एनसीसीचा विस्तार करण्यासंदर्भात मंत्रालयात काल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले याची माहिती भुसे यांनी माध्यमांना दिली. भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांत देशाविषयी आदरभाव निर्माण व्हावा यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर केल्या जातील. विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी राज्यात एनसीसीची प्रशिक्षण केंद्रे वाढवून मिळावीत यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत.
माजी सैनिकांची मदत घेणार
राज्यात सध्या सात ग्रुप्स, 63 युनिट्स असून यात 1726 शाळा आणि महाविद्यालयांतील 1 लाख 14 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशिक्षण मिळेल असा सरकारचा विचार आहे. यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिक कल्याण मंडळाच्या मदतीने माजी सैनिकांची मदत घेण्यात येईल.
राष्ट्रगीतासोबत राज्यगीतही बंधनकारक
मराठी शाळेसोबतच आता (Schools) सर्व माध्यमांच्या शाळांसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळांत आता राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक असेल. जी शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
मराठी शाळेत राष्ट्रगीत आणि राज्यगीत मानवंदनेने गायलं गेलं पाहिजे. मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक आहे असा आदेश देण्यात आला आहे. याआधी इयत्ता चौथी आणि सातव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होत होती. त्यानंतर पाचव्या आणि आठव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. मात्र, आता यानंतर इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा संकल्प दादा भुसे यांनी व्यक्त केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..