रस्त्यावर व्यायाम करताना भरधाव ट्रकनं 6 मुलांना चिरडलं; चौघांचा मृत्यू, गडचिरोलीतील भयावह घटना….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गडचिरोली :- “गडचिरोलीमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव ट्रकने 6 मुलांना चिरडल्याची माहिती आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना नागपुरच्या रूग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.
गडचिरोली- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत असताना अज्ञात ट्रकची जोरदार धडक बसली. दोन मुलांचा जागीच मृत्यू तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे, संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
रस्त्यावर व्यायाम करत असताना चिरडलं
मिळालेल्या माहितीनुसार सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत होती, त्याचवेळी अज्ञात ट्रकची जोरदार धडक बसल्याने दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोघांना नागपुरच्या रूग्णालयात हलवण्यात आलं आहे, या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे, संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आर्थिक मदत- मुख्यमंत्री
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत, घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे, तर मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याचंही सांगितलं आहे. ‘गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या 1 तासात त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येईल. मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल’, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 महिलांना अज्ञात वाहनाने उडवले दोघींचा जागीच मृत्यू
परभणी-गंगाखेड महामार्गावरील दैठणा गावात देखील अशीच एक घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 महिलांना अज्ञात वाहनाने उडवलं. या घटनेमध्ये दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना परभणी-गंगाखेड महामार्गावरील दैठणा गावात घडली आहे. पुष्पाबाई उत्तमराव कच्छवे आणि अंजनाबाई शिसोदे या दोघे जणी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना अचानक एका वाहनाने दोघींना उडवले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही महिलांच्या अपघाती जाण्याने दैठणा गावावर शोककळा पसरली आहे, अपघाताबाबत पोलीस तपास करत आहेत.