‘भगव्या’चा अपमान करणाऱ्यांना देव शिक्षा करेल..! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञा कडाडल्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मालेगाव :- “मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज निकाल जाहीर केला. माजी खासदार साध्वी प्रज्ञा या अन्य सात आरोपींसह निर्दोष सुटल्या आहेत.
न्यायालयाच्या निकालानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘भगव्या’चा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देव (Mumbai NIA Court) शिक्षा करेल, असं वक्तव्य मालेगाव प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी केलंय.
साध्वी प्रज्ञा काय म्हणाल्या?
साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, त्यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले होते. निर्दोष आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांना वारंवार लढा द्यावा लागला. अनेक वर्षे अपमान सहन करत होते. वारंवार संघर्ष करावा लागला. दोषी नसतानाही कलंकित ठरवण्यात आले, अशा भावना साध्वी प्रज्ञा यांनी रडून व्यक्त केल्याचं न्यायालयीन निरीक्षक म्हणाले आहेत.
आज भगवा जिंकला आहे, हिंदुत्व जिंकले आहे, भगवा दहशतवादाचा आरोप खोटा सिद्ध झाला आहे, असं देखील साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलंय. भगव्या’चा अपमान करणाऱ्यांना देव शिक्षा करेल, असा देखील इशारा त्यांनी दिलाय.
कर्नल पुरोहित यांची प्रतिक्रिया
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांना न्यायालयातच रडू कोसळले. न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर भावनिक भाषण करताना ठाकूर यांच्या डोळ्यात पाणी होते. कारण त्यांनी संघर्ष आणि अपमानाच्या दीर्घ वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. या प्रकरणातून निर्दोष सुटलेले आणखी एक आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहित यांनीही न्यायालयात मोठं विधान केलंय. मी एक सैनिक आहे, देशावर निःशर्त प्रेम करतो. देश नेहमीच सर्वोच्च असतो, त्याचा पाया मजबूत असला पाहिजे. काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला, आम्हाला ते सहन करावे लागले. जय हिंद, असं त्यांनी म्हटंलय.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..