अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज आमंत्रित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.20 :- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना राबविण्यात येतात.
या शैक्षणिक वर्षातील या योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरु करण्यात आलेले आहे. महाविद्यालयांनी शासन निर्णयानुसार संबंधित महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क मंजुरी, विद्यापीठाद्वारे मंजूर होणाऱ्या इतर शुल्क इत्यादी बाबीची मान्यता संबंधित सक्षम शैक्षणिक विभाग, शासकीय यंत्रणेकडुन करुन घेण्यात यावी.
या योजनांचे अर्ज विद्यार्थ्यांनी एनपीसीआय बँक आधारलिंक करुन ऑनलाईल पध्दतीने विहीत कालावधीच्या आत परीपुर्ण भरून कागदपत्रासह महाविद्यालयास सादर करावे. महाविद्यालयांनी नियमानुसार शिष्यवृत्तीस पात्र व परीपुर्ण मुळ टीसीसह असलेले अर्ज ऑनलाईन 30 जून पुर्वी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात मंजुरीसाठी सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मंगला मुन ह्या करित आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..