जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रेमंड येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन ; मुख्यमंत्री सहायता कक्ष, रेमंड व निस्वार्थ फाऊंडेशनचा सहभाग….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.20 :- मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, रेमंड युको डेनिम लि व निस्वार्थ सेवा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रेमंड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याहस्ते झाले. शिबिरात 103 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याहस्ते झाले. यावेळी रेमंड युको डेनिम लिमिटेडचे कार्य निर्देशक नितीन श्रीवास्तव उपस्थित होते. रेमंड युको डेनिम लिमीटेडने शहरासह जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सोबतच सामाजिक दायित्वाचे भान ठेवून दरचार महिन्यांनी रक्तदान शिबिर कंपनीच्या सहकार्याने आयोजित केले जाते. शहरातील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल होणाऱ्या थालेसेमिया, सिकलसेल, प्रसूती तसेच अपघातग्रस्त रुग्णास रक्तरुपी जीवनदान देण्यास मोलाचे योगदान ठरले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये अनेक कर्मचाऱ्यांसोबतच अधिकाऱ्यांनी देखील रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रेमंडचे श्री.पातुरकर, श्री.चांडक, जयवीर राठोड, मयुर काळे, निलेश कोरे, निलेश जगताप तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. निस्वार्थ सेवा फाउंडेशनतर्फे परशुराम कडू, अनिकेत नवरे, किशोर बाभूळकर, करण गेडाम आणि सर्व निस्वार्थ टीम तसेच मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक तथा वरीष्ठ समाजसेवा अधीक्षक अनिल पिसे, डॉ. प्रसाद बनसोड, आनंद देशपांडे यांनी परिश्रम घेतले. रक्त संकलन करण्यासाठी श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाची रक्त संकलन चमू यांनी विशेष योगदान दिले, असे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..