विकसित कृषी संकल्प अभियानाला जिल्ह्यात उत्तम प्रतासाद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.२० :- जिल्ह्यात कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा, अक्शन फॉर फूड प्रोडक्शन, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र व ईफकोच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले. अभियानांतर्गत १५ दिवस गावोगावी शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले.
अभियान कालावधीत कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती, नवीन पिक प्रकार, शासकीय योजनांची माहिती तसेच मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, घाटंजी, मारेगाव, वणी, केळापूर, झरी जामनी या तालुक्यातील प्रत्येक दिवशी प्रत्येक तालुक्यातील तीन गावांमध्ये जावून विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात आले.
अभियानांतर्गत शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधून खरीप पूर्व पिक नियोजन, खरीप हंगामासाठी माती परीक्षण, योग्य बीज प्रक्रिया करून पेरणी करण्याचे महत्त्व, रुंद वरंबा सरी पद्धत, कापूस पिकामध्ये अति सघन लागवड पद्धत, तण व्यवस्थापन, फवारणी दरम्यान घ्यावयाची काळजी, रोग व कीड व्यवस्थापन व कृषी विभागाच्या योजना याविषयी मार्गदर्शन व माहिती दिली.
या १५ दिवसीय अभियानांतर्गत रोज दोन फिरत्या कृषी रथांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांशी थेट संपर्क साधून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..