नव तेजस्विनी प्रकल्पांतर्गत माविमचे वार्षिक क्रेडिट प्लॅन सेमिनार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.२० :- नव तेजस्विनी प्रकल्पांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ माविमच्यावतीने वार्षिक क्रेडिट प्लॅन सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारला चांगला प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला माविमच्या मुख्यालयातील फूड प्रोसेसिंगचे व्हॅल्यू चेन सल्लागार सचिन आहेर ऑनलाईन उपस्थित होते. तसेच विभागीय सल्लागार केशव पवार, व्यवसाय विकास सल्लागार पवन देशमुख, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे, अग्रणी बँक प्रबंधक ज्ञानेश्वर टापरे, जिल्हा उद्योग केंद्राचे रसिक वऱ्हाडे, विविध बॅंकांचे सचिन निर्मळ, ए.एम.महाजन, पियुष मानकर, श्रीकांत मुळे तसेच सर्व सीएमआरसी अध्यक्ष, व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले. त्यानंतर विभागीय सल्लागार केशव पवार यांनी राज्यस्तरीय सादरीकरणाद्वारे माविमची सद्यस्थिती, नव तेजस्विनी प्रकल्प, उपजीविका विकास उपक्रम आणि आगामी क्रेडिट प्लॅनबाबत सविस्तर माहिती दिली. वर्ष २०२४-२५ मध्ये माविमने क्रेडिट प्लॅनच्या माध्यमातून १२७ टक्के लक्ष्य पूर्ण करत ९३.७ कोटींची कर्जे वितरित केली. वर्ष २०२५-२६ साठी ११० कोटींचे उद्दिष्ट असलेला नवीन क्रेडिट प्लॅन सुनील सोसे यांनी सादर केला.
यावेळी संतोष डाबरे, अतुल इंगळे, ज्ञानेश्वर टापरे यांनी आपापल्या योजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात गेल्या आर्थिक वर्षात उत्कृष्ट बँक लिंकेज करणाऱ्या बँकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन व्यवस्थापक सुनंदा मानकर यांनी केले तर आभार सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी रामगोपाल साहू यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रकल्प सल्लागार योगेश देशमुख, एमआयएस सल्लागार राहुल वसाके, गायत्री उर्कुटकर, शेषराव मेश्राम यांनी योगदान दिले.

बच्चू कडू हे गुवाहाटीला केवळ पैशासाठीच गेले. भाजपच्या जवळच्या व्यक्तीनेच केली शिंदेंच्या बंडाची पोलखोल…..
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….