जिल्ह्यात नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रभावीपणे राबवा :- जिल्हाधिकारी विकास मीना ; जिल्हाधिकाऱ्यांकडून साक्षरता कार्यक्रमाचा आढावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.२० :- वय वर्ष १५ ते ३५ वयोगटातील निरक्षरांना शिक्षणाच्या प्रक्रीयेत समाविष्ठ करून संख्या ज्ञान, अक्षर ज्ञानासोबत व्यावसायिक कौशल्य, संगणक, डिजीटल ज्ञानाच्या बाबतीत साक्षर करण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केल्या.
महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. साक्षरता कार्यक्रम एप्रिल २०२२ ते मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येत आहे. कार्यक्रमांतर्गत १५ ते ३५ वयोगटातील निरक्षरांना शिक्षणाच्या प्रक्रीयेत समाविष्ठ करण्यासोबतच त्यांना आवश्यक बाबींमध्ये साक्षर करण्यात येत आहे. संबंधित निरक्षरांना कार्यक्रमाच्या माध्यमातून ५ वी, ८ वी, १० वी व १२ वी ची परीक्षा देण्यास प्रेरीत केले जाते.
कार्यक्रमांतर्गत या वर्षाकरिता जिल्ह्यासाठी १५ हजार ६६ निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार उद्दिष्टाची तालुकानिहाय विभागणी करण्यात यावी आणि विहित वयोगटातील प्रत्येक निरक्षर व्यक्तीस शिक्षणाच्या प्रवाहात सामील करुन घ्यावे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी गटस्तरावर नियामक परिषद रचना व कार्यकारी समिती गठीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केल्या.
कार्यक्रमाच्या कार्यवाहीसाठी ऑनलाईन सर्वेक्षणाकरिता विकसित करण्यात आलेला NILP मोबाईल ॲप नवभारत साक्षरता अभियानाचे काम पाहणारे सर्व अधिकारी, कर्मचारी व शालेयस्तरावरील सर्व पर्यवेक्षीय यंत्रणा, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी डाऊनलोड करावे. ॲपमध्ये निरक्षर व स्वयसेवकांची नोंदणी करावी. गटस्तरीय समितीने तालुकानिहाय दिलेली निरक्षरांच्या संख्येची महसुली गावांनुसार विभागणी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वयंसेवक म्हणून ५ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची निवड करत येईल, असे ते म्हणाले. बैठकीस माध्यमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बच्चू कडू हे गुवाहाटीला केवळ पैशासाठीच गेले. भाजपच्या जवळच्या व्यक्तीनेच केली शिंदेंच्या बंडाची पोलखोल…..
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….