नगर परिषद निवडणुकी साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागवे :- माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- नगर परिषद निवडणूकीची प्रक्रिया सुरु झालेली असून कार्यकर्त्यांनी या प्रक्रिये वर बारीक नजर ठेऊन प्रभाग रचना व मतदार यादया बरोबर बनविल्या जातील या कडे लक्ष ढेवावे जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे ते म्हणून खचून न जाता जोमाने कामाला लागवे असे आव्हाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस चे सदस्य माणिकराव ठाकरे यांनी केले
आज दिनांक 19 जून रोजी पुसद येथे झालेल्या काँग्रेस कमेटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष ऍड. शिवाजीराव मोघे, यवतमाळ चे आमदार बाळासाहेब मांगूळकर, प्रदेश अल्प. विभागाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.वजाहात मिर्झा, डॉ. मोहम्मद नदीम, जिला अल्प. अध्यक्ष झफर खान, जितेंद्र मोघे प्रामुख्याने उपस्थित होते.

माणिकराव ठाकरे पुढे म्हणाले देशातील शेतकरी हवालदिल झालेला आहे, युवा बेरोजगार आहे, केंद्र व राज्य सरकार सर्व सामान्यांच्या प्रश्ना बाबत उदासीन आहे देशात निव्वळ जातीवाद पसरविण्याच काम ते करत आहे.फुले शाहू आंबेडकरांच्या विचारा चा हा महाराष्ट्र आहे कै. वसंतराव नाईक यांनी याचं विचाराधारेवर राजकारण केले आहे धर्म निरपेक्ष तत्वशी त्यांची नाळ जुळलेली होती. सत्तेत असलेली त्यांची वन्शज इकडे तिकडे गेले असेल तरी ही कार्यकर्त्यांनी काळजी करू नये जनता काँग्रेस विचाराची आहे आणि येणार्या काळात काँग्रेसला बळकटी देणार यात शन्का नाही.
या प्रसंगी ऍड शिवाजीराव मोघे यांनी सांगितले की शेतकरी या देशाचा कणा आहे देश कृषी प्रदान आहे शेतकऱ्यांच्या अडचणी च्या वेळस काँग्रेस शासन शेकऱ्यांच्या पाठीशी राहत असे सध्याचे केंद्र व राज्य शासन भांडवल दाराचे पाठीशी आहेत जनतेला सर्व लक्षात येत आहे जनता सत्ताधार्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही होणाऱ्या स्थानीक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत करूंकर्त्यांनी कमाल लागवे राहुल गांधी देशात संघर्ष करीत आहे त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याकडे शासनाला लक्ष देने भाग पडत आहे.
या बैठकीत आमदार बाळासाहेब मांगूळकर, माजी आमदार डॉ. वजाहत मिर्झा, जफर खान यांची समायोचित भाषणे झाली डॉ. मोहम्मद नदीम यांनी प्रस्ताविक केले सूत्रसंचालन शहर अध्यक्ष झिया शेख आणि विलास वाघमारे तर आभार प्रदर्शन ज्ञानदीप कांबळे यांनी केले
तालुका व शहर काँग्रेस ने आयोजित या बैठकीत शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्या सह सय्यद इस्ती्यक महासचिव प्रदेश अल्प.,लियायक पठाण, अनिल शिंदे, तहेसीन खान, ऍड. गजानन देशमुख, जब्बार लाखे, गोपाल राठोड, सय्यद जानी,वासिउल्लाह मिर्झा,एहसान खान,संजय कन्हेड, वाजीद पाशा, सादिक सौदागर, दत्ता निळकंडे, श्री काळे,हाशीर खान, अभीलाश खैरमोडे, नईम इजारदार,सोहेल चव्हाण, सोहेल निरवान,सादिक डी जे.,बळीराम चव्हाण,डॉ. मोहसीन, माजिद लाला, इर्शाद खान,शाहिद बेग, सरदार बेग,अझहर खतीब,इस्माईल बुखारी,युनूस ठेकेदार,रहेमान गौरी, अफरोज गुलशन, हकीमोद्दीन सिद्दी्की,मखदुम खान,राहील खान, अब्दुल्लाह खान, समद कुरेशी,इस्राईल गुड्डू,अकील सर, इकबाल ठेकेदार, दाऊद खान, जाफर अली सह पधादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवट राष्ट्रगीताने झाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..