शरद पवारांचे एक घाव, दोन तुकडे, त्यानंतर आज अजित पवारांचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मा अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, काल शरद पवार यांनी स्वत:च या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आज माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकी संदर्भात शरद पवारांनी सभासदांशी संवाद साधला.
त्यानंतर माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट का घेतली? त्यामागे काय उद्देश आहे? ते समजू शकलेलं नाही. “टोकाची भूमिका घेण्याची आपली इच्छा नाही. पण पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा पहावी लागते” असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार शेतकरी पॅनल माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांचा सामना अजित पवारांच्या पॅनलशी आहे.
“काही लोक सत्तेचा गैरवापर करतील. पण आपण स्वच्छ निवडणूक लढवायची आहे. आपलं जे मत, अधिकार आहे, तो कोणाला विकायचा नाही” असं शरद पवार सभासदांना म्हणाले. “आपल्या शेतकरी वर्गाला एक रुपया टॅक्स भरावा लागता कामा नये. शेतकऱ्याला टॅक्स नसावा. वन नेशन वन इलेक्शन या कमिटीत देखील मी आहे. सर्व निवडणूक पारदर्शक आणि गुण्यागोविंदाने झाली पाहिजे. माळेगाव निवडणुकीत युगेंद्र पवार आणि कार्यकर्ते देखील प्रचारात मेहनत घेत आहेत. माळेगाव कारखान्याची मी देखील सभासद आहे. माळेगाव कारखाना बिनविरोध व्हावा अशी माझी इच्छा होती. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी लाखो रुपये कमवितो आहे याचा मला अभिमान आहे” असं सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणाल्या.
शरद पवारांची भूमिका काय?
“कुणी तरी आता म्हणालं सर्वांना बरोबर घ्या. सर्वांना बरोबर घ्यायला हरकत नाही. पण सर्व म्हणजे कोण? गांधी, नेहरू यांचा विचार आणि फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार मानत असेल तर त्यांनासोबत घेणं मान्य आहे. पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा. पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असूच शकत नाही. त्यामुळे संधी साधूपणाचं राजकारण प्रोत्साहीत करायचं नाही. त्यादृष्टीने पावलं टाकायचं आहे. आम्ही संधीसाधूंसोबत जाणार नाही” असं शरद पवार यांनी म्हटलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..