राज्यात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात आज सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्याला हवामान विभागाने ऑरेन्ज अलर्ट जारी केला आहे.
या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा जिल्ह्यात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस, 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भाला देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोल्हापूर घाटमाथा, नाशिक, धुळे नंदुरबार, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना या जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
कोकण विभागासाठी पुढील 24 तास अतिशय महत्वाचे असतील. कोकण विभागाला हवामान खात्याने हवामानाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. समुद्रात भरती येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
उद्या कसं असेल राज्यातील हवामान
गुरुवारी 19 जून रोजी राज्यात 4 जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. यात रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या भागाचा समावेश आहे. या भागातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, जळगाव, छ. संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..