विरोधी तीन पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार कोण..? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी मी माझे नाव जाहीर केले.मात्र निवडणूक लढवणाऱ्या विरोधी तीन पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार कोण आहेत, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुशिष्यांना दिले.
शिरवली येथे श्री निलंकठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.यावेळी पवार पुढे म्हणाले, तुम्ही मला खुष करा, मी तुम्हाला खुश करतो.पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये माळेगावला देतो,असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना दिले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की,खोट बोल पण रेटून बोल अशा पध्दतीने विरोधक आमचेवर आरोप करीत आहेत.कारखान्यावर कर्ज नाही.कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे.
विरोधकांनी त्यांची सत्ता असताना कसा कारभार केला, हे सभासदांना माहीत आहे.त्यांचे काळात कमी रिकव्हरीमुळे साखर उत्पादन कमी झाले.इथेनॉल कमी भावात विकले.पाच वर्षात ८ कोटी युनिट कमी विज तयार झाल्याने ४८ कोटी रुपये नुकसान झाले, याला जबाबदार कोण?माझेवर सहकार बुडवण्याचा आरोप खोटा आहे.सहकार मोडायचा असता तर मी बारामतीतील संस्थांना १२५ कोटी रुपये दिले नसते,असे पवार म्हणाले. कारखान्याला आर्थिक शिस्त लावली जाईल.कारखान्याचा एक हि पैसा न घेता सिएसआर फंडातुन काम केले जाईल,असे पवार यांनी आश्वासन दिले.
– आपण सहकार महर्षी म्हणता आपले कारखान्याच्या स्थापनेत काय योगदान आहे.आता वय झालं आहे.पायजमा ऐवजी लुंगी घालता.आपणास विस्मरण देखील होत आहे असा टोला चंद्रराव तावरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
– कारखान्याची साखर भिजली हे जर सिध्द केले तर आता निवडणुकीत माघार घेतो.जर सिध्द झाले नाही तर तुम्ही माघार घेणार का? असे आवाहन चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांना अजित पवार यांनी दिले.
– चेअरमन म्हणून माझ्यात काम करण्याची धमक आहे.तुमचा प्रपंचात आर्थिक सुबत्ता व संपन्नता आणली जाईल.माझ्याकडे सहकार,कृषी खाते आहे.तुम्हाला हवी ती मदत करतो.माझ्या सारखे काम करण्याची धमक विरोधकांकडे आहे का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..