अँड. सुलतान फतेह अली शाह यांची आजाद समाज पार्टीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार एड.चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मनीष सती, राज्य प्रभारी प्रसाद उपासक आणि रुपेश बागेश्वर यांच्या माध्यमातून एड. सुलतान फतेह अली शाह यांची पक्षाच्या महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
पुसद नप चे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता साकिब शाह यांचे धाकटे बंधू असलेले एड.सुलतान शाह यांनी पुण्यातील आझम कॅंपस या एक प्रतिष्ठित मायनॉरिटी विद्यापीठातून विद्यार्थी नेता आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सार्वजनिक जीवनाला सुरवात केली.विद्यार्थी दशेतच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मा. कांशीराम यांच्या विचारांवर काम करण्याचा निर्धार केला. खासदार एड चंद्रशेखर आझाद यांचे ते अतिशय विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जातात. त्यांनी उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघ, झारखंड विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी संघटनात्मक कार्य केले.महाराष्ट्रात त्यांनी एनआरसी विरोधी आंदोलन, बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) च्या माध्यमातून दलित समाजाच्या हक्कांसाठी चालवलेल्या चळवळींमध्ये, आणि इतर अनेक सामाजिक संघर्षांमध्ये निरंतर सक्रिय सहभाग असतो.त्यांच्या या सर्व योगदानाच्या पार्श्वभूमीवर, आजाद समाज पार्टीने विश्वास ठेवून महाराष्ट्रातील युवक चळवळीची धुरा त्यांच्या हाती सोपवली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..