“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फसवणूक, हेराफेरी आणि जनादेशाचे पद्धतशीर उल्लंघन करून लोकशाहीचे वस्त्रहरण कसे केले गेले हे राहुल गांधी यांच्या लेखातून तर्कसंगत मांडणी केलेली आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच संशय बळावला असल्याने या गंभीर प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देऊन संभ्रम दूर करणे अपेक्षित असताना भाजपाकडून त्याची उत्तरे दिली जात आहेत हे आणखी गंभीर असून निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाले यावर शिक्कामोर्तब करणारे आहे, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
रमेश चेन्नीथला यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जे घडले ते अचानक घडलेले नाही तर ते अतिशय काळजीपूर्वक आखलेले ऑपरेशन होते, लोकशाही प्रक्रियेवर एक सुनियोजित हल्ला होता. राहुल गांधी यांच्या सविस्तर खुलाशातून हे विचलित करणारे सत्य उलगडले आहे. एकेकाळी लोकशाहीचा दीपस्तंभ असलेल्या महाराष्ट्रातून लोकशाही मुल्ल्यांना काळीमा फासला जात आहे हे विदारक आहे. निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे पण आयोगाकडून त्यावर समाधानकारक खुलासा केला जात नाही. आयोगाकडून केवळ वरवरची उत्तरे दिली जात आहेत. चंदिगड उच्च न्यायालायनेही हरियाणा विधानसभा निवडणूक प्रश्नी सीसीटीव्ही फुटेज देण्यास सांगितले असता सरकारच्या मदतीने नियम बदलून ती माहिती देता येणार नाही असा बदल करण्यात आला तो का व कशासाठी, असा प्रश्न चेन्नीथला यांनी उपस्थित केला.
दरम्यान, महाराष्ट्रात मतदारयाद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला. बोगस मतदान करण्यात आले. मतांची टक्केवारी वाढवली. मतांची टक्केवारी सात सात दिवस जाहीर केली नाही हे सर्व संशायास्पद आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्षांना प्रचंड मोठा विजय मिळाला पण पाच महिन्यात एकदम उलट परिणाम कसे येऊ शकतात. काहीतरी काळेबेरे असल्यानेच भाजपा व निवडणूक आयोग लपवालपवी करत आहे पण हे सत्य बाहेर आणण्यासाठी काँग्रेस यापुढेही पाठपुरावा करत राहील, असे चेन्नीथला म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..